Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरराजकीय

विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी निवडणूक खर्च निरीक्षकांच्या नियुक्त्या

अहिल्यानगर, दि.२२- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १२ मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

sai nirman
जाहिरात
 देबशीष बिस्वास (आय.आर.एस.)  यांची २१६ अकोले, २१७ संगमनेर, २१८ शिर्डी व २१९ कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी  निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.बिस्वास यांच्याशी ८९०२१९९९०० या मोबाईल  क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. त्यांचा मुक्काम   शासकीय विश्रामगृह संगमनेर येथे असणार आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून अपर प्रवरा सब डिव्हीजनचे सहायक अभियंता प्रमोद माने  यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ८६५७५७७७७७,८९७५२२४८१९ असा आहे.

 अरुण चौधरी

(आय.आर.एस. सी अँड सीई) यांची २२० श्रीरामपूर, २२१ नेवासा, २२२ शेवगाव व २२३ राहुरी विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.चौधरी यांच्याशी ७०४५६५१५१३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. त्यांचा मुक्काम महात्मा फुले कृषी विद्यापीठ विश्रामगृह राहुरी येथे असणार आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक रोहित निरगुडे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७५८८६०४१५१ असा आहे.

ग्यानचंद जैन (आय.आर.एस. सी अँड सीई) यांची २२४ पारनेर, २२५ अहमदनगर, २२६ श्रीगोंदा व २२७ कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आहे. श्री.जैन यांच्याशी ८२६२९८६५१८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. त्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृह अहिल्यानगर येथे असणार आहे. निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून पाणी पुरवठा विभागाचे सहायक शिवम दापकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ७२७६२४९९८२ असा असल्याचे निवडणूक शाखेमार्फत कळविण्यात आले आहे.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button