Letest News
मंत्र्यांचे राजकारण वाढले-मंत्र्यांच्या तिसऱ्या पिढ्या सत्तेत-२० वर्षे रस्त्याची वाट लागली-मंत्री-मह... कर्करोग रुग्णांसाठी शिर्डीत मोफत हाडांची तपासणी श्री साईनाथ रुग्णालयात १५ ऑगस्टला विशेष शिबिर कमरेला १० इंची कोयता-लोकरे जेरबंद-शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल-वृंदावन हॉटेल येथे शिर्डी पोलिसांच... नगर–मनमाड रोडवरील बिअर शॉपी पुन्हा चर्चेत; बिअरची बाटली डोक्यात फोडली! चावडी-द्वारकामाईच्या मार्गासाठी दिशादर्शक फलकांची मागणी साईभक्त संतोष कोते यांचे संस्थानच्या कार्यका... पुणतांब्यात चांगदेव महाराजांच्या दर्शनासाठी दीड लाख भाविकांचा जनसागर! समृद्धी महामार्गावर आगीचा तांडव!मालट्रक-कंटेनरचे टायर फुटल्याने भीषण अपघात- वाहनाने घेतला पेट= एकाचा... पालखी सोहळ्यात दोन भाविक महिलांच्या सोनसाखळ्या लंपास! अयोध्या राममंदिरातील दानपेटी प्रकरणाच्या निषेधार्थ कोपरगावात शिवसेनेचे आंदोलन महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय-शिर्डी नगरपरिषदेला मिळाला परिविक्षाधीन मुख्याधिकारी!
क्राईमशिर्डी

ऐन निवडणूक काळात कोयता हातात घेऊन फिरणारे दोन तरुण जेरबंद! शिर्डी पोलिसाची कारवाई !

शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टिकोनातून शिर्डी पोलिसांच्या माध्यमातून विविध उपाय योजना करण्यात येत असून त्या अनुषंगाने २८ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या वेळी सपोनी भारत बलैया हे शिर्डी शहर परीसरात गस्त घालत असताना पोलीस खबरीने दिलेल्या माहितीनुसार दोन तरुण आंबेडकर नगर शिर्डीत हातात कोयता घेऊन आपली दहशत निर्माण करण्यासाठी मी भाई आहे,

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मारून टाकू असे म्हणून कोयता हातात घेऊन आरडाओरड करत असल्याची माहिती मिळताच तात्काळ पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने खाजगी वेशात जाऊन त्या ठिकाणी गोंधळ घालत असलेले व हातात धारदार कोयता असलेले दीपक गोरख वाघ वय २२राहणार ,पानमळा शिर्डी व प्रेम सुधाकर शेजवळ २६ राहणार गणेशवाडी शिर्डी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची नाव गाव चौकशी केली असता

त्यांनी वरील प्रमाणे माहिती दिल्यानंतर या दोघांच्या विरोधात शिर्डी पोलिसांनी शस्त्र अधिनियम१९५९ २५,४ पोलीस अधिनियम १३५ ३७(१) ३७(३) शिर्डी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आधिक तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुभांर हे करीत आहे. दरम्यान अहिल्या नगर जिल्ह्यात शिर्डी हे एक आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असून येथे पोलीस अधीक्षकांचा धाक राहिला नाही.

राजरोसपणे शिर्डीत गुन्हेगार हत्यार घेऊन निवडणूक काळात दहशत माजवत आहेत. शिर्डीत गुन्हेगारीचे किती जाळेमुळे पसरले आहे हे यावरून दिसते. शिर्डीत गुन्हेगारी वाढत चालली आहे. मात्र त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी काहीच उपाययोजना पोलिसांकडून केली जात नसल्याचे नागरिक, साई भक्त बोलत आहेत.

ऐन निवडणूक काळात तरी येथे कायदा व सुव्यवस्था आणि शांतता रहावी यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. असेही बोलले जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button