Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
क्राईमशिर्डी

“साईनगरीत वाढत्या गुन्हेगारीवर डॉ. पिपाडांचा पोलिस महासंचालकांना भावनिक पत्र “

शिर्डी | प्रतिनिधी
साईबाबांच्या पावनभूमी असलेल्या शिर्डीत वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी पोलिस महासंचालकांचे लक्ष वेधत तातडीने कठोर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शिर्डीचे पावित्र्य अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर पोलिसांचा प्रभावी वचक निर्माण करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून हस्तक्षेप होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


डॉ. पिपाडा यांनी पत्र देऊन चर्चेदरम्यान सांगितले की, शिर्डी मतदारसंघात एका शेतकऱ्याच्या मुलाला मोक्का प्रकरणातील आरोपी दीपक पोकळे याने जिवंत जाळून ठार मारल्याची घटना घडली. त्यानंतर साईबाबा मंदिराच्या गेटजवळ भरदिवसा खुनाची घटना घडल्याने संपूर्ण राज्य हादरले. याशिवाय कामगारांचे खून, चेन स्नॅचिंगसारख्या वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे स्थानिक नागरिकांसह साईभक्तांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


देश-विदेशातून लाखो भाविक श्रद्धेने शिर्डीत येतात. मात्र, वाढत्या गुन्हेगारीमुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अशा घटना सुरूच राहिल्यास शिर्डीची प्रतिमा मलिन होऊन भाविकांची संख्या कमी होण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.
डॉ. पिपाडा यांनी पोलिस महासंचालकांना शिर्डीसाठी विशेष सुरक्षा आराखडा तयार करणे, गुन्हेगारांविरोधात कठोर मोहीम राबवणे, सराईत आरोपींवर प्रभावी कारवाई करणे आणि मंदिर परिसरासह संपूर्ण शहरात पोलिस बंदोबस्त व गस्त वाढवण्याची मागणी केली.


“शिर्डी ही श्रद्धेची नगरी आहे, दहशतीची नाही. साईनगरीचे पावित्र्य कायम राखण्यासाठी आणि गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस महासंचालकांनी स्वतः लक्ष घालून कठोर निर्णय घ्यावेत,” अशी ठाम भूमिका डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी मांडली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button