Letest News
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आस्पायर कुस्ती संकुलचा दबदबा!मालेगावच्या सर्वच पैलवानांची विजयी कामगि बाबांवरील विश्वासाने ‘अशक्य’ शक्य १५०० साईभक्तांची संकल्पपूर्ती यात्रा यशस्वी-पैशापेक्षा भाविकांचे ह... ““‘लिस्टवर येऊ नका’ गुन्हेगारांना एसपींचा थेट तडीपारीचा इशारा!” पोलिसांच्या लिस्टवर आलात तर तडीपार क... शिर्डीत मध्यरात्री संशयास्पद हालचाली दुचाकीसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात! संकटात साई संस्थान ठरले आधारवड!कर्मचाऱ्यास अपघात विम्यापोटी साडेतीन लाखांची मदत पर्युषण महापर्वानिमित्त जिल्ह्यातील कत्तलखाने मांस विक्री केंद्रे बंद जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया य... चाकूचा धाक दाखवून तरुणीला घेऊन पसार! भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण रोशन घेगडमलसह दोघांविरुद्ध तक्रार प्रवीणभाऊ आल्हाट यांची मानवाधिकार असोसिएशनच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती थरावर थर… कौशल्याचा कहर! शिर्डीत सनमित्र-क्रांतीच्या दहीहंडीचा पुन्हा एकदा जल्लोष अहिल्यानगरचा डाग पुसण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची धडपड शिर्डीतील काही पोलिसांमुळे प्रयत्नांना तिलांजल...
अ.नगरक्राईम

““‘लिस्टवर येऊ नका’ गुन्हेगारांना एसपींचा थेट तडीपारीचा इशारा!” पोलिसांच्या लिस्टवर आलात तर तडीपार करणार!”

डीजे, वादग्रस्त प्रदर्शन अन् गुन्हेगारी पार्श्वभूमीवर एसपी सुदर्शन यांचा गणेश मंडळांना सज्जड इशारा
राहुरी : गणेशोत्सव हा उत्साह, श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव आहे. मात्र उत्सवाच्या नावाखाली कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट आणि कडक इशारा पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमका यांनी राहुरी येथील शांतता समितीच्या बैठकीत गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
“राजकारण राजकारणाच्या जागेवर ठेवा. मिरवणुकीत वादग्रस्त फोटो, प्रदर्शन अथवा कोणत्याही प्रकारचे आक्षेपार्ह कृत्य करून स्वतःला अडचणीत आणू नका. आमची तुमच्याशी कोणतीही दुश्मनी नाही; मात्र कायदा मोडला तर कारवाई करावीच लागेल. मला कारवाई करण्यासाठी भाग पाडू नका,” अशा शब्दांत एसपी सुदर्शन यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना अक्षरशः खडसावले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


डीजेचा दणदणाट नको; पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्या
यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक डीजे मुक्त काढण्याचे आवाहन त्यांनी केले. डीजेच्या वाढत्या आवाजामुळे वृद्ध, लहान मुले तसेच आजारी व्यक्तींना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्यामुळे उत्सवाच्या नावाखाली ध्वनी प्रदूषणाच्या नियमांची पायमल्ली कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
“डीजे वापरू नये, असे सांगणारा मीही भारतीय नागरिक आहे. उत्सव आदर्श पद्धतीने साजरा करणाऱ्या गणेश मंडळांचा पोलिसांकडून सन्मान केला जाईल,” असेही एसपी सुदर्शन यांनी सांगितले.


“लिस्टवर येऊ नका; तडीपारीची कारवाई होऊ शकते!”
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींवर पोलिसांची करडी नजर असून, गुन्हेगारांच्या यादीत असलेल्या व्यक्तींवर आवश्यकतेनुसार तडीपारीची कारवाई केली जाऊ शकते, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
“पुढील विसर्जन मिरवणुकीत तुमचे नाव पोलिसांच्या कारवाईच्या यादीत येऊ देऊ नका,” असा स्पष्ट संदेश त्यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिला.
“फक्त कायदा मोठा; कोणताही नेता कायद्यापेक्षा मोठा नाही!”
काही राजकीय नेत्यांकडून डीजे वाजणारच, अशा प्रकारची वक्तव्ये केली जात असल्याबाबत प्रश्न उपस्थित झाल्यानंतरही एसपी सुदर्शन यांनी आपली भूमिका स्पष्ट ठेवली. “फक्त कायदा मोठा आहे. कायदा आणि नियम चालवण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहेत. जे नियम तोडतील त्यांच्यावर कारवाई होणारच,” असा ठाम इशारा त्यांनी दिला.
कोणत्याही राजकीय किंवा इतर व्यक्तीच्या नावाचा गैरवापर करून कायदा मोडण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


गणेशोत्सवातून समाजसेवेचा आदर्श उभारा
राहुरी ही पुण्यभूमी असून येथील गणेश मंडळांनी महाराष्ट्रासमोर आदर्श निर्माण करावा, असे आवाहन एसपी सुदर्शन यांनी केले. गणेशोत्सवाला केवळ जल्लोषाची जोड न देता सामाजिक उपक्रमांची जोड द्यावी, असे त्यांनी सांगितले.
गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, सायकली तसेच शिक्षणासाठी आवश्यक मदत उपलब्ध करून देऊन गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी जपावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


डिजिटल अरेस्ट, पॉक्सो आणि ड्रग फ्री राहुरीवरही भर
गणेश मंडळांच्या माध्यमातून समाजोपयोगी जनजागृती करण्यावरही पोलिसांनी भर दिला आहे. डिजिटल अरेस्ट, पॉक्सो कायदा, अमली पदार्थांविरोधातील जनजागृती तसेच राहुरीला ‘ड्रग फ्री राहुरी’ करण्यासाठी कम्युनिटी पोस्ट इनिशिएटिव्ह प्रत्येक मंडळात राबविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अनेक मंडळांनी या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल एसपी सुदर्शन यांनी त्यांचे आभार मानले.
गणेशोत्सव श्रद्धेचा असावा, दहशतीचा नव्हे; जल्लोष असावा, कायद्याची पायमल्ली नव्हे. राहुरी पोलिसांनी यंदा गणेश मंडळांना दिलेला संदेश स्पष्ट आहे—“उत्सव करा, पण कायद्याच्या चौकटीतच!”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button