Letest News
राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत आस्पायर कुस्ती संकुलचा दबदबा!मालेगावच्या सर्वच पैलवानांची विजयी कामगि बाबांवरील विश्वासाने ‘अशक्य’ शक्य १५०० साईभक्तांची संकल्पपूर्ती यात्रा यशस्वी-पैशापेक्षा भाविकांचे ह... ““‘लिस्टवर येऊ नका’ गुन्हेगारांना एसपींचा थेट तडीपारीचा इशारा!” पोलिसांच्या लिस्टवर आलात तर तडीपार क... शिर्डीत मध्यरात्री संशयास्पद हालचाली दुचाकीसह दोघे पोलिसांच्या जाळ्यात! संकटात साई संस्थान ठरले आधारवड!कर्मचाऱ्यास अपघात विम्यापोटी साडेतीन लाखांची मदत पर्युषण महापर्वानिमित्त जिल्ह्यातील कत्तलखाने मांस विक्री केंद्रे बंद जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया य... चाकूचा धाक दाखवून तरुणीला घेऊन पसार! भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण रोशन घेगडमलसह दोघांविरुद्ध तक्रार प्रवीणभाऊ आल्हाट यांची मानवाधिकार असोसिएशनच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती थरावर थर… कौशल्याचा कहर! शिर्डीत सनमित्र-क्रांतीच्या दहीहंडीचा पुन्हा एकदा जल्लोष अहिल्यानगरचा डाग पुसण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची धडपड शिर्डीतील काही पोलिसांमुळे प्रयत्नांना तिलांजल...
राजकीयशिर्डी

बाबांवरील विश्वासाने ‘अशक्य’ शक्य १५०० साईभक्तांची संकल्पपूर्ती यात्रा यशस्वी-पैशापेक्षा भाविकांचे हास्य मोठे विजयराव कोते झाले भावूक

शिर्डी (प्रतिनिधी) – हजारो किलोमीटरचा प्रवास, शेकडो तासांचा प्रवासातील सहवास आणि हजारो भाविकांच्या ओठांवर अखंड ‘साईनाम’… अखेर ही यात्रा मायभूमीत परतली; मात्र यात्रेकरूंच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहून साईनिर्माण ग्रुपचे अध्यक्ष विजयराव कोते यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. कारण हा केवळ एका यात्रेचा समारोप नव्हता, तर तब्बल १२ वर्षांच्या सेवाभावी संकल्पाचा भावनिक कळस होता.
साईनिर्माण ग्रुप, साईसिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली काशी-अयोध्या-पशुपतिनाथ-मनकामना संकल्पपूर्ती तीर्थयात्रा प्रचंड यशस्वी ठरली. २९ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरदरम्यान झालेल्या या यात्रेत तब्बल १५०० साईभक्तांनी काशी विश्वनाथ, अयोध्या, नेपाळमधील पशुपतिनाथ आणि मनकामना या पवित्र स्थळांचे दर्शन घेतले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


१२ वर्षे… २५ हजार भाविक… आणि एकच संकल्प!
‘सबका मालिक एक’ हा साईबाबांचा संदेश केवळ बोलण्यात न ठेवता तो कृतीत आणण्याचा संकल्प साईनिर्माण ग्रुपने गेल्या १२ वर्षांपासून जपला आहे. या काळात २५ हजारांहून अधिक साईभक्तांना नाममात्र शुल्कात १२ ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडविण्यात आले.
सोमनाथ, मल्लिकार्जुन, महाकालेश्वर, केदारनाथ, काशी विश्वनाथ, त्र्यंबकेश्वर, रामेश्वरम् यांसह बारा ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाचा हा सेवाभावी प्रवास यंदाच्या संकल्पपूर्ती यात्रेने एका वेगळ्याच उंचीवर पोहोचला.
पालखी सोबत होती… म्हणून प्रवास ‘यात्रा’ झाला!
या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रवासात साईबाबांची पवित्र पालखी भाविकांसोबत होती. बसचा प्रवास असो किंवा तीर्थक्षेत्राचा मुक्काम—अखंड साईनामाचा गजर, भजन-कीर्तन आणि सामूहिक आरतीने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले.
त्यामुळे ही यात्रा केवळ धार्मिक स्थळांना भेट देणारी नव्हती; तर एकत्र प्रवास, एकत्र प्रार्थना आणि एकत्र साईनामात रमलेली सामूहिक आध्यात्मिक साधना ठरली.


‘पैसा नाही… या चेहऱ्यांवरील हास्य हीच माझी कमाई!’
यात्रेकरूंच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहताना विजयराव कोते भावूक झाले.
“गेल्या १२ वर्षांत आम्ही २५ हजार लोकांना ज्योतिर्लिंगांचे दर्शन घडवले. १५० लक्झरी बसमधून ६५०० भाविकांना काशी यात्रा घडवली. विमानाने बद्री-केदारनाथ यात्राही घडवली. मात्र आज प्रत्येक यात्रेकरूच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान हेच माझ्या १२ वर्षांच्या सेवेचे खरे फळ आहे. पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा या हास्यातच खरे सुख आहे,” असे कोते यांनी सांगितले.


१५०० भाविकांची जबाबदारी… आणि बाबांवरील अढळ विश्वास!
“१५०० साईभक्तांना सुखरूप घेऊन येणे हे माझ्यासमोर मोठे आव्हान होते. मात्र बाबा आपल्या सोबत आहेत, बाबा कोणतेही संकट येऊ देणार नाहीत, हा विश्वास मनात होता. त्याच इच्छाशक्तीने आणि आत्मविश्वासाने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली आणि प्रत्येक यात्रेकरूला समाधानाने मायभूमीत परत आणता आले,” असे भावनिक उद्गार विजयराव कोते यांनी काढले.
विजयराव कोते, कैलास बापू कोते तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून हा सेवाभावी उपक्रम सातत्याने सुरू आहे.
शिर्डीच्या साईभूमीतून सुरू झालेला हा सेवाभावाचा प्रवास आता केवळ यात्रेपुरता मर्यादित राहिलेला नाही; हजारो भाविकांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधानच या १२ वर्षांच्या संकल्पाची खरी ओळख बनले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button