Letest News
सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप... साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ... साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कमलाकर कोते यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचा...
अ.नगरशिर्डी

शिर्डीत शिल्पा शेट्टींचं भक्तीपूर्ण दर्शन बहीण शमितासोबत साईबाबांच्या समाधीवर भेट धुपाआरतीत सहभाग

बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आपल्या बहीण शमिता शेट्टीसह शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. दर्शनानंतर दोघींनी साईबाबांच्या धुपाआरतीतही भाग घेतला. यावेळी साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आणि प्रशांत सूर्यवंशी यांनी शिल्पा शेट्टी यांचा शॉल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


साईबाबांचा आशीर्वाद घेऊन मनात समाधानाची लहरी

“साईबाबां

चे बोलवणं आलं की, मी लगेच शिर्डीला येते. साईबाबा माझी कायम आठवण ठेवतात आणि मला त्यांच्या दर्शनासाठी बोलावतात. हे माझं भाग्य आहे. आज साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मनाला खूप समाधान आणि आनंद वाटला.” – शिल्पा शेट्टी


श्रद्धा आणि सबुरी: शिल्पा शेट्टीचा जीवनमंत्र

“सध्या कोणतीही अडचण नाही. हातपाय काम करत आहेत, शरीर तंदुरुस्त आहे. अडचणींचा काळ तोच असतो, जेव्हा मन अस्वस्थ असतं. पण माझ्याबरोबर साईबाबा आहेत, त्यामुळं कुठलीच अडचण नाही. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरी हा महामंत्र प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचला पाहिजे.”


साईबाबांप्रती कृतज्ञतेचा भाव

“साईबाबा मला मागण्याआधीच सगळं काही देतात. त्यामुळं आज मी साईबाबांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिर्डीत आली आहे.”


वर्कफ्रंट: शो आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला

शिल्पा शेट्टी अलीकडे ‘इंडियन पुलिस फोर्स’ मध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय आणि ईशा तलवारसोबत दिसली होती. आता ती कन्नड चित्रपट ‘केडी – द डेव्हिल’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत संजय दत्त, ध्रुवा सरजा आणि नोरा फतेही यांसारखे स्टार्स असणार आहेत. शिल्पाचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button