Letest News
सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस साईबाबांची सायंकाळची आरती आता साडेसहा वाजता सूर्यास्ताच्या वेळेनुसार आरतीच्या वेळेत बदल १० सप्टेंबरप... साईबाबांच्या समाधी मंदिरातील दर्शन वेळेत बदल१० सप्टेंबरपासून रात्री ९.३० वाजता दर्शन प्रक्रिया सुरू नुसते फोटो काढून श्रेय घेता येत नाही पत्रव्यवहार दाखवा!” — खासदार निलेश लंके यांचा सुजय विखेंना घणाघ... साईचरणी पुण्याच्या साईभक्ताची अनमोल भेट१२ लाख ८२ हजारांचा आकर्षक सुवर्ण मुकुट अर्पण पंढरपूरच्या विठ्ठल चरणी कमलाकर कोते यांचा वाढदिवस वाढदिवसानिमित्त विठ्ठल-रखुमाईचे दर्शन परिस्थितीला पंक्चर करत साहिलची डॉक्टर होण्याकडे गरुडझेप! वडील पंक्चर काढतात मुलगा आता रुग्णांवर उपचा...
क्राईमशिर्डी

‘लाडू प्रसाद कारखाने सील’च्या कथित खोट्या बातमीवर शिर्डी पोलिसांत फिर्याद दाखल

शिर्डी (प्रतिनिधी) : श्री साईबाबा संस्थानच्या प्रसादालय, लाडू व बर्फी निर्मिती विभागाबाबत सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या कथित खोट्या व दिशाभूल करणाऱ्या पोस्टप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात कायदेशीर फिर्याद दाखल करण्यात आली आहे. संस्थानचे कर्मचारी संदीपकुमार पुंडलीकराव भोसले यांनी दिलेल्या फिर्यादीत, एका इंस्टाग्राम अकाऊंटवरून संस्थानची प्रतिमा मलिन करण्याचा आणि साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, “24 News Marathi Official” या इंस्टाग्राम अकाऊंटवर “तुकाराम मुंढेंचा धडाका, शिर्डी साईबाबा मंदिर संस्थानाविरोधात FDA ची मोठी कारवाई, लाडू प्रसाद बनविण्याचे कारखाने सील” अशा आशयाची पोस्ट प्रसारित करण्यात आली होती. या पोस्टमध्ये अन्न व औषध प्रशासनाने (FDA) संस्थानच्या लाडू निर्मिती केंद्रांवर कारवाई करून ते सील केल्याचा दावा करण्यात आला होता. तसेच प्रसादालयातील स्वच्छता व अन्नधान्याच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


मात्र फिर्यादीने या सर्व दाव्यांचे स्पष्टपणे खंडन केले असून ही माहिती पूर्णपणे खोटी, तथ्यहीन आणि दिशाभूल करणारी असल्याचे म्हटले आहे. श्री साईबाबा संस्थानच्या वतीने चालविण्यात येणारे प्रसादालय, लाडू व बर्फी निर्मिती विभाग हे अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे पालन करून कार्यरत असल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. वापरण्यात येणाऱ्या अन्नधान्याची व कच्च्या मालाची तपासणी संस्थानच्या प्रयोगशाळेसह NABL मान्यताप्राप्त आणि शासकीय प्रयोगशाळांमध्ये केली जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीत पुढे म्हटले आहे की, श्री साईबाबा संस्थान हे जगभरातील कोट्यवधी साईभक्तांच्या श्रद्धेचे केंद्र असून दररोज हजारो भाविक प्रसादालयाचा लाभ घेतात. अशा परिस्थितीत संस्थानच्या प्रसादाबाबत खोटी माहिती प्रसारित करून भाविकांच्या मनात शंका निर्माण करणे, संस्थानची प्रतिमा डागाळणे आणि धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर प्रकार आहे.


विशेष म्हणजे संबंधित पोस्टमध्ये एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला असून, त्यांनी थेट आदेश देऊन कारवाई केल्याचा दावा करण्यात आला होता. या दाव्यांमुळे राज्यभरातील साईभक्तांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी संबंधित इंस्टाग्राम अकाऊंट चालवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी फिर्यादीने शिर्डी पोलिसांकडे केली आहे. सोशल मीडियावर कोणतीही माहिती प्रसारित करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळून न पाहता अशा प्रकारच्या पोस्ट टाकल्यास त्याचे गंभीर कायदेशीर परिणाम होऊ शकतात, याकडेही या प्रकरणामुळे लक्ष वेधले गेले आहे.
आता शिर्डी पोलीस या फिर्यादीची दखल घेऊन संबंधित इंस्टाग्राम अकाऊंटची माहिती, पोस्टचा स्रोत आणि त्यामागील व्यक्तींचा शोध घेणार का, याकडे साईभक्तांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. संस्थानसारख्या जागतिक कीर्तीच्या धार्मिक संस्थेबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यांचे सत्य काय, याचा उलगडा पोलीस तपासानंतरच होणार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button