Letest News
शिर्डीत दिवसाढवळ्या धर्मशाळेची भिंत जमीनदोस्त शिवसेना पदाधिकाऱ्यासह ५ जणांवर गुन्हा संघटित गुन्हेगारीचे कलम १११ लागू आरोपींवर 'मोक्का'सारखी कठोर कारवाई AI चा गैरवापर की राजकीय कट? पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या नावाने मॉर्फ ऑडिओ-व्हिडिओ प्रकरण-संगम... शरीरात घुसला चक्क बॉलपेन- श्री साईनाथ रुग्णालयात दुर्मिळ व जीवघेण्या शस्त्रक्रियेला यश शिर्डीतील महिला हत्येनंतर माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची काव्यात्मक टीका-सोशल मीडियावर चर्चेला उध... शिर्डीच्या भूमिपुत्री डॉ. सिमरन साई कोतकर यांची वारकऱ्यांसाठी निस्वार्थ सेवा-सर्वत्र कौतुकाचा वर्षाव शिर्डी पोलिसांचा गुटखा माफियांवर धडक प्रहार! दोन ठिकाणी एकाच वेळी छापे दोघे ताब्यात हजारो रुपयांचा ग... साई समाधीवरील चित्रीकरण प्रकरण पेटले- सखोल चौकशीसह फोटो एडिट करून विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची ... महिलेचा खळबळजनक आरोप-बलात्कार-पिस्तुलाचा धाक जीवे मारण्याच्या धमक्या शिर्डी पोलिसांत मध्यरात्री FIR जर्मनीतील ४१ साईभक्तांची शिर्डीत भक्तीमय साईसेवा समाधी मंदिरात गुंजले साईभजन
क्राईमशिर्डी

बंद दरवाजामागचं गूढ उघडलं- शिर्डीत हॉटेल कामगाराचा गळफास-कारण अद्याप गुलदस्त्यात

शिर्डी शहराला हादरवून टाकणारी अत्यंत धक्कादायक व गंभीर घटना समोर आली असून, शिर्डी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले साई नंदादीप हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुण कामगाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर काही काळ  साई नंदादीप हॉटेल परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते, 
मृत तरुणाचे नाव विशाल रवींद्र वायकर (वय अंदाजे २२ वर्षे) असे असून तो मूळचा संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे. रोजगारासाठी तो शिर्डीत आला होता व सध्या राहता तालुक्यातील गणेशनगर येथे वास्तव्यास होता. विशाल हा शिर्डीतील  साई नंदादीप हॉटेलमध्ये कामगार म्हणून प्रामाणिकपणे काम करत होता, अशी माहिती समोर येत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


घटनेची सविस्तर माहिती अशी की, काल दुपारपासून संबंधित हॉटेलमधील एका खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे हॉटेल व्यवस्थापनाच्या लक्षात आले. बराच वेळ उलटूनही दरवाजा न उघडल्याने आणि आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने व्यवस्थापनाची चिंता वाढली. अखेर संशय बळावल्याने तात्काळ शिर्डी पोलिसांना माहिती देण्यात आली.
माहिती मिळताच शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सिंघम सागर काळे यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचांच्या उपस्थितीत दरवाजा उघडण्यात आला असता, विशाल वायकर याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हे दृश्य पाहून उपस्थितांची मने सुन्न झाली.


पोलिसांनी घटनास्थळी सखोल पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी राहात येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी कोणतीही सुसाईड नोट आढळून आली आहे का, मोबाईलमध्ये काही संदेश, कॉल रेकॉर्ड किंवा मानसिक तणावाची कारणे आहेत का, याचा पोलिसांकडून बारकाईने तपास सुरू आहे.
विशालने टोकाचे पाऊल उचलण्यामागे कामाचा ताण, वैयक्तिक अडचणी, आर्थिक समस्या की अन्य काही कारण आहे, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मृत तरुणाच्या नातेवाइकांना घटनेची माहिती देण्यात आली असून त्यांच्या जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.


दरम्यान, शिर्डी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद व गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. तरुण वयात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून, तपासाअंती काय निष्पन्न होते याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button