Letest News
भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात!
अ.नगरशिर्डी

शिर्डीतील ग्रामदैवते यांच्याबरोबरच हाजी अब्दुल बाबा यांची झोपडीहि  ग्रामस्थांकडे किंवा संस्थानं कडे वर्ग करण्यात यावीत

शिर्डी ( प्रतिनिधी)
शिर्डी शहरातील ग्रामदैवत असणारी सर्व मंदिरे यांच्याबरोबरच हाजी अब्दुल बाबांची झोपडी  ग्रामस्थांकडे किंवा श्री साईबाबा संस्थान कडे वर्ग करण्यात यावेत अशी मागणी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान शिर्डीचे कार्याध्यक्ष समीर रामचंद्र वीर यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


त्यांनी अप्पर जिल्हाधिकारी व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, शिर्डी येथे 10 फेब्रुवारी 2025 रोजी ग्रामसभा संपन्न झाली. त्यामध्ये शिर्डी शहरातील ग्रामदैवत असणारी श्री गणपती मंदिर, श्री शनि महाराज मंदिर, श्री महादेव मंदिर, श्री हनुमान मंदिर आदी मंदिरे साई संस्थान कडे सध्या देखभालीसाठी असून ती पुरवत साई संस्थानाने ग्रामस्थांकडे वर्ग करावीत.

असा ठराव होऊन साई संस्थान कडे ग्रामस्थांच्या वतीने तशी मागणी करण्यात आली आहे. मात्र शिर्डीत हाजी अब्दुल बाबा यांची झोपडी असून त्यांची देखभाल खाजगी व्यक्ती करून तेथे मिळणारा देणगीरुपी निधी स्वतःसाठी वापरतात. त्यामुळे शिर्डी शहरातील  हि हाजी अब्दुल बाबा यांची झोपडी  ग्रामस्थांकडे किंवा श्री साईबाबा संस्थानकडे वर्ग करण्यात यावीत.

अशी समीर वीर यांची मागणी असून त्यासाठी राहाता तालुक्याचे आमदार नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सुजय विखे यांनी  विशेष लक्ष घालावे .अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री तसेच पालकमंत्री, व विधी आणि न्याय मंत्री यांना पाठवण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button