Letest News
शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे पोलीस ठाण्यातही लिंगपिसाट भोंदू खरातचा माज साक्षीदारांनाच दिली दमदाटी! भोंदू खरातचा जेलमधील मुक्काम वाढला-कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राहात्यात गर्भलिंग रॅकेटचा महाभंडाफोड-पुण्यापर्यंत पोहोचले धागेदोरे- राहता तालुक्यातील “मोठे मासे” र... साईदरबारात पुन्हा दिसली प्रामाणिकतेची झलक-१५ हजारांची पर्स साईभक्ताला सुखरूप परत इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैनस्नॅचिंग-श्रीरामपूरची टोळी जेरबंद-LCB ची धडाकेबाज कारवाई पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड
शिर्डी

यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन केंद्रीय आर्थिक गुन्हे शाखेच्या उपसंचालक पदी नियुक्ती मिळविलेले शिर्डीचे भूमिपुत्र  अनिल विष्णू कोते 

शिर्डी प्रतिनिधी
भारतीय प्रशासन सेवेची अर्थात यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन केंद्रीय आर्थिक गुन्हे शाखेच्या उपसंचालक पदी नियुक्ती मिळविलेले अनिल विष्णू कोते यांनी उच्चपदस्थ अधिकारी होऊन शिर्डी शहराच्या नावलौकिक वाढविला आहे त्यांचा आदर्श शिर्डी व परिसरातील विद्यार्थ्यांनी घेऊन उच्चपदस्थ अधिकारी होण्याचे ध्येया मेहनतीने वाटचाल करावी असे प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी केले आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


शिर्डी येथील भूमिपुत्र अनिल विष्णू कोते यांनी नुकतीच भारतीय प्रशासन सेवेची अर्थात यूपीएससी परीक्षेत यश संपादन करून केंद्रीय आर्थिक गुन्हे शाखेच्या उपसंचालक पदी नियुक्ती मिळवली आहे याबद्दल शिर्डी शहरातील शिवसेना कार्यालय असलेल्या शिवालय येथे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी अनिल कोते यांचा सत्कार केला

याप्रसंगी मान्यवर उपस्थित होते
जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यावेळी म्हणाले की विद्यार्थ्यांनी शालेय अवस्थेतच आपले ध्येय निश्चित केले पाहिजे अनिल कोते यांनी सुरुवातीपासूनच उच्चपदस्थ अधिकारी बनण्याचं स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न प्रत्यक्षात पूर्ण करण्यासाठी अनिल ने ध्येयापासून विचलित न होता जिद्द चिकाटी व मेहनतीने वाटचाल केली ध्येय गाठण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करून सातत्यपूर्ण अभ्यास केला तर यश हमखास प्राप्त होते व स्वतःबरोबरच कुटुंबांची सुद्धा स्वप्नपूर्ती होऊन संकल्प सिद्धीस जातो याचा वस्तू पाठ अनिल याने शिर्डी व परिसरातील विद्यार्थ्यांना घालून दिला आहे

त्याचा आदर्श घेऊन परिसरातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा कडे आपलं लक्ष केंद्रित करून स्वतः अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्याबरोबरच गावाचे व आई वडिलांचे नाव उज्वल करावे असे आवाहन यावेळी कमलाकर कोते यांनी केले विलास कोते,राहुल गोदकर,विजय कोते,जयराम कांदळकर,शहादेव बडे,पत्नी ऋशाली कोते उपस्थित होते

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button