Letest News
निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद “कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड “१० हजारांत पोटातील भविष्य विक्रीला!” — राहाता तालुक्यात गर्भलिंग निदानाचा काळाबाजार उघड जबरदस्ती धर्मांतराचा आरोप —आरोपी ताब्यात-विविध कलमांन्वये गुन्हा दाखल- शिर्डीत खळबळ- मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल “९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट स...
अ.नगरशिर्डी

संस्थानची परवानगी नसताना साई फोटो एडिट करणाऱ्यांवर होणार कारवाई!

शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी मध्ये साईभक्तांना साई मंदिरात साईदर्शन करत असतानाची छायाचित्रे काढण्यास साईबाबा संस्थानची परवानगी नसताना  तरीही येथे मंदिर परिसराच्या बाहेर फोटो काढून संगणकावर एडिटिंग करून साई मंदिरात समाधीचे दर्शन घेतानाचे फोटो मोठी रक्कम घेऊन साई भक्तांना विक्री केली जात आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

ही एक प्रकारे संस्थांनची, साईभक्तांची पैसे कमवण्यासाठी फसवणूकच आहे. या विरोधात आता ग्रामस्थ, साईभक्त चर्चा करीत असून शिर्डी नगरपालिका, साई संस्थान व शिर्डी पोलीस प्रशासन  आता‌असे संगणकावर एडिटिंग करून साई समाधीचे दर्शन घेताना चे साई भक्ताचे फोटो विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे समजते.


शिर्डीत साईबाबा मंदिराच्या परिसरात अनेकजण कॅमेरे घेऊन फिरत असतात. साई समाधीचे दर्शन करतानाचे फोटो संगणकावर एडिटिंग करून आपणास देण्यात येईल असे सांगून साई भक्तांची पैसे घेऊन व संगणकावर तसे फोटो एडिटिंग करून विक्री केले जातात.

असे अनेक तरुण येथे फिरताना दिसतात. संगणकाच्या साह्याने भाविकांचे साईसमाधीचे दर्शन घेतानाचे फसवी छायाचित्रे संगणकावर मिक्सिंग करून ते फोटो मोठी रक्कम घेऊन त्या साई भक्ताला देत असल्याचे निदर्शनास आले आहे. फोटो एडिटिंग वेगवेगळ्या पद्धतीने करून अनेक जण साईबाबा मंदिरात काढलेले फोटो आहेत

असा भास निर्माण करून विकतात आणि भाविकांची फसवणूक करत असल्याच्या तक्रारी येत आहेत . साई भक्त हे फोटो आपल्या गावी ,शहरात घेऊन जातात .तेथे दाखवतात जर समाधी मंदिरात फोटो काढण्यास परवानगी नाही तर हे फोटो आले कसे असा प्रश्न इतरांना पडतो. एक प्रकारे ही फसवणूकच आहे.


अशाप्रकारे संगणकावर साई मंदिरातील फोटो एडिटिंग करून विक्री करणाऱ्यांवर  शिर्डी नगर परिषद ,पोलिसांची मदत घेऊन कारवाई सुरू करणार आहे, असा इशारा शिर्डी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी दिला आहे.शिर्डी शहरात साईभक्त, भाविकांना साईदर्शनप्रसंगी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही व आर्थिक चटका देखील बसणार नाही.

यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यात फोटो एडिटिंग देखील फसवणूक कक्षेत येते. त्यामुळे असे फोटो काढणारे व परिसरात कॅमेरे घेऊन फिरणारे अशा तरुणांवर साईबाबा संस्थान, शिर्डी नगरपरिषद व शिर्डी पोलिस अशी संयुक्त कारवाई करणार असल्याचे समजते.

नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणतात कि ह्या फोटो एडिट करून विकणाऱ्यांची तक्रारी आल्याने कारवाई करण्यात येत आहे  मात्र शिर्डी नगर परिषदेच्या हद्दीत हॉटेल मिनी पंजाब हॉटेलचे अनधिकृत केलेल्या अतिक्रमणाबाबत अनेकदा तक्रारी करून उपोषणे करून देखील ते अतिक्रमण काढले जात नाही. हे काम संस्थानाचे व पोलिसांचे असतांना नगर परिषद कारवाई करते मग नगर परिषदेचे काम कोण करणार हा मोठा प्रश्न आहे  

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button