Letest News
श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर २० हजारांचा सौदा'! संगमनेरच्या तांबे हॉस्पिटलवर ACB चा गुन्हा मॅनेजरसह दोघे जाळ्यात ऊर्जा बचतीचा संदेश देत श्री साईबाबा इंग्लिश मीडियम स्कूलची दैदिप्यमान कामगिरी अल्पवयीनेचे अपहरण करून बलात्कार आरोपीला नैसर्गिक मृत्यूपर्यंत सश्रम कारावास! शिर्डी दर्शनावरून परतणाऱ्यांवर थरारक दरोडा अपहरण करणाऱ्या टोळीतील ५ जण स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्य... शिर्डी हादरवणाऱ्या हत्येतील आरोपी महिलांना कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी साईनगरीत रक्तरंजित थरार! मंदिराच्या गेट क्रमांक ४ समोर महिलेचा निर्घृण खून- जागेच्या वादातून दोन तरु... बँकेच्या 2.11 कोटींच्या थकबाकीवरून शिर्डीत हॉटेलवर कारवाई-ताबा घेण्यास विरोध-चार महिलांविरुद्ध शिर्ड... साईबाबांच्या चरणी विधानपरिषद अध्यक्ष राम शिंदे समाधी दर्शनानंतर संस्थानकडून सत्कार "निष्ठावान कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये-भाजप सदैव त्यांच्या पाठीशी उभा आहे" – विधानपरिषदेचे सभापती प...
अ.नगरक्राईम

श्रीरामपूरात खळबळ! अल्पवयीन मुलीचे अपहरण-अत्याचार आरोपी सोनू बेगच्या अडचणीत मोठी भर

श्रीरामपूर (प्रतिनिधी)
श्रीरामपूर शहरात एकाचवेळी संताप आणि खळबळ उडवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. सरस्वती कॉलनी परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी आधीच पोलिस कोठडीत असलेल्या सोनू उर्फ जयप्रकाश अशोक बेग (वय 40, रा. श्रीरामपूर) याला आता अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी POCSO कायद्याअंतर्गत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील पीडित मुलगी गर्भवती असल्याची माहिती समोर आल्याने संपूर्ण श्रीरामपूर हादरले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलै रोजी पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान या अपहरणामागे सोनू बेगचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
पुढील चौकशीदरम्यान अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघड झाले असून, वैद्यकीय तपासणीत ती गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले. या धक्कादायक निष्कर्षानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत तसेच संबंधित गंभीर कलमांनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.


आधीच बेकायदेशीर शस्त्रप्रकरणात कोठडीत असलेल्या आरोपीच्या विरोधात आता अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंद झाल्याने त्याच्या अडचणींमध्ये मोठी भर पडली आहे. या घटनेमुळे श्रीरामपूर शहरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या संवेदनशील प्रकरणात वेगाने तपास करून आरोपीवर POCSO अंतर्गत कारवाई केल्याबद्दल श्रीरामपूर शहर पोलिसांच्या कार्यवाहीचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button