Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
क्राईमशिर्डी

“९ नाण्यांचा वाद” पुन्हा पेटला — शिर्डीत संतापाची लाट-“भीती संपली म्हणून धंदा?” — ग्रामस्थांचा थेट सवाल-विखेंकडे तक्रार — प्रकरणाला राजकीय रंग

शिर्डीत साईबाबांच्या नावावर सुरू असलेल्या तथाकथित “९ नाण्यांच्या” प्रकरणाने पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले असून, ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत थेट राजकीय नेत्यांकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी आंदोलनामुळे थांबलेला हा प्रकार आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाल्याचे आरोप होत असून, संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
⚠️ आंदोलन दडपलं… पण ‘नाण्यांचा खेळ’ पुन्हा तेजीत!
यापूर्वी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडत हा प्रकार थांबवला होता. त्या वेळी प्रशासन आणि संबंधितांनी काही काळ गप्प बसण्याची भूमिका घेतली. मात्र आता पुन्हा “मूळ नाणी” म्हणून प्रदर्शन, जाहिरात आणि देणग्यांच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार सुरू झाल्याचे समोर येत आहे
👉 “आंदोलनाची भीती संपली, म्हणून पुन्हा धंदा सुरू?” असा थेट सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🔥 श्रद्धा की ‘ब्रँडिंग’? — भाविकांची उघड दिशाभूल!
“साईबाबांची मूळ नाणी” या नावाखाली देश-विदेशात प्रदर्शन भरवून भाविकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले जात असल्याचा आरोप आहे.
👉 अनेक ठिकाणी “हीच खरी ९ नाणी” असा दावा केला जातो, पण त्याला कोणतीही अधिकृत नोंद, पुरावा किंवा संस्थानची स्पष्ट मान्यता नसल्याचे दिसते.
👉 त्यामुळे “श्रद्धेचा ब्रँड बनवून पैसा उकळण्याचा उद्योग” सुरू असल्याची टीका जोर धरू लागली आहे.
🛑 “मूळ पादुका संस्थानकडेच” — मग बाहेरचा खेळ कशासाठी?
श्री साईबाबांच्या मूळ पादुका संस्थानकडे असल्याचे वारंवार सांगितले जाते. तरीही बाहेर वेगवेगळ्या गटांकडून “मूळ नाणी” दाखवून भक्तांना आकर्षित केले जात आहे.
👉 यामुळे “संस्थानकडे एक सत्य आणि बाहेर दुसरे?” असा गोंधळ निर्माण झाला आहे.
👉 भाविकांची श्रद्धा आणि विश्वास यांच्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

विखेंकडे थेट तक्रार — राजकीय पातळीवर लढा!
या प्रकरणाचा पर्दाफाश व्हावा यासाठी ग्रामस्थ आणि काही स्थानिक नेते आता थेट
राधाकृष्ण विखे पाटील
आणि
सुजय विखे पाटील
यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल करण्याच्या तयारीत आहेत.
👉 “ही केवळ धार्मिक बाब नाही, तर आर्थिक गैरव्यवहाराचा मुद्दा आहे” असे सांगत सखोल चौकशीची मागणी केली जाणार आहे.


👉 दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरत आहे.
⚖️ मोठी चौकशी अपरिहार्य — ‘कोण आहे मागचा सूत्रधार?’
या प्रकरणात खालील मुद्द्यांवर तपासाची मागणी होत आहे:
👉 मूळ ९ नाण्यांची खरी ओळख आणि त्यांची अधिकृत नोंद आहे का?
👉 वेगवेगळ्या ठिकाणी दाखवली जाणारी नाणी नेमकी कुठून आली?
👉 प्रदर्शन आणि देणग्यांमधून जमा होणारा पैसा कुठे जातो?
👉 या सर्व प्रकारात कोणत्या व्यक्ती किंवा गटांचा सहभाग आहे?

शेवटचा सवाल — भक्तीचा अपमान की मोठा घोटाळा?
साईबाबांच्या पवित्र नावावर चाललेला हा “नऊ नाण्यांचा खेळ” आता फक्त श्रद्धेपुरता मर्यादित राहिलेला नाही, तर तो सरळ संशयास्पद आर्थिक व्यवहार बनत असल्याचे चित्र आहे.
👉 “श्रद्धेच्या नावावर चालणारा हा धंदा थांबणार का?”
👉 “खरी नाणी कोणती… आणि खोटं कोण पसरवतंय?”
शिर्डीकर, साईभक्त आणि संपूर्ण महाराष्ट्र आता उत्तराची वाट पाहत आहे —
कारण हा प्रश्न फक्त नाण्यांचा नाही… तर श्रद्धेच्या विश्वासाचा आहे!

“मी नाही त्यातली…” — गुरुंची भूमिका संशय वाढवणारी?
“९ नाणे” प्रकरणात आता आणखी एक वादग्रस्त पैलू समोर येत आहे. गुरु
अमित देशमुख
यांच्याबाबत विरोधाभासी चर्चा रंगू लागल्या आहेत.
माहितीनुसार, संस्थानकडून रजा घेऊन ते संबंधित “९ नाण्यांच्या” आरती कार्यक्रमात सहभागी झाले असल्याचे बोलले जात आहे. मात्र, यावर प्रतिक्रिया देताना देशमुख यांनी “मी नाही त्यातली… आणि कडी लावा आतली” अशी भूमिका घेतल्याची चर्चा असून, त्यामुळे संशय अधिकच बळावला आहे.
👉 जर ते कार्यक्रमात सहभागी नव्हते, तर त्यांच्या उपस्थितीबाबत चर्चा का? त्याठिकाणी त्यांच्या हस्ते आरतीचे फलक का?
👉 आणि जर सहभागी होते, तर आता नाकारण्यामागचे कारण काय?
या विरोधाभासी भूमिकेमुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम आणि संताप वाढत असून, “खरे काय आणि खोटे काय?” हा प्रश्न अधिकच तीव्र झाला आहे.
👉 त्यामुळेच आता या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून सत्य बाहेर आणण्याची मागणी जोर धरत आहे.

शिर्डीत सध्या काही “चांडाळ चौकडी” साईबाबांच्या नावावर कफनी आणि तथाकथित “मूळ नाणी” घेऊन फिरत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. विशेष म्हणजे, या कार्यक्रमांमध्ये संस्थानच्या कर्मचाऱ्यांचे फलक लावले जात असून, त्यांच्या सोबत म्हाळसापतींचे वंशज दिसत असल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.
👉 “हा नेमका श्रद्धेचा प्रचार की उघड बाजार?” असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.
याहून धक्कादायक बाब म्हणजे — ज्याने साईबाबांच्या डीएनए टेस्टबाबत बेताल वक्तव्य केले, त्याच्याविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असतानाही त्याच्यासोबत काही जण उघडपणे फिरत असल्याचे चित्र आहे.
👉 “गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीला साथ देणे म्हणजे कायद्यालाच आव्हान नाही का?” असा प्रश्न उपस्थित होतो.
ग्रामस्थांची ठाम मागणी:


👉 संस्थानच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करावी
👉 संबंधित कर्मचारी आणि व्यक्तींवर कठोर कारवाई करावी
👉 वादग्रस्त नाणी तात्काळ संस्थानच्या ताब्यात घ्यावीत
“साईबाबांच्या नावावर चाललेला हा प्रकार थांबवा, नाहीतर मोठे आंदोलन उभे राहील” — असा इशारा आता उघडपणे दिला जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button