Letest News
शिर्डीत अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा हातोडा-विकी मिसरच्या अड्ड्यावर पहाटेच धाड १५ वर्षांनंतरही शिर्डीच्या जखमा ताज्याच- रचित-प्रविण हत्याकांडाची वेदना अजूनही अस्वस्थ भक्तनिवासात महिला भाविकेचा विनयभंग- कंत्राटी कर्मचारी फरार शिर्डीत 'देऊळबंद 2'ची मोठी घोषणा-आत्महत्याग्रस्त शेतकरी मुलींच्या शिक्षणासाठी कमाईचा निधी साईभक्तांच्या चोऱ्या रोखण्यात अपयशी ठरलेल्या कबाडींकडे मंदिर सुरक्षा-‘अपयशाला बक्षीस की भाविकांच्या ... शिर्डीत विनापरवाना आम पापड विक्रीचा सुळसुळाट नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू? तातडीच्या कारवाईची नाग... जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डीत महामृत्युंजय राज समता पतसंस्थेतील बनावट खाते प्रकरणाचा तपास आता एसआयटीकडे-आरोपींच्या अडचणी वाढणार अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री-विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत तक्रार समिती स्थापन करा- जिल्हा महिला व बाल विकास ...
क्राईमशिर्डी

मुंबईच्या झोपडपट्टी दादाची शिर्डीत पेट्रोल पंपावर दादागिरी -शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

शिर्डी शहरातील पिंपळवाडी रोडलगत असलेल्या सीएनजी पेट्रोल पंपावर काल (मंगळवार) रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत आलेल्या चौघांनी मोठा धिंगाणा घालत पंपावरील कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
🟥 “सिगरेट ओढू नका” म्हटल्यावर संताप; कर्मचाऱ्यावर तुटून पडले
मिळालेल्या माहितीनुसार, शहाड (मुंबई परिसर) येथील सत्येंद्र अनिल पवार हा आपल्या तीन साथीदारांसह चारचाकी वाहनातून सीएनजी भरण्यासाठी पंपावर आला होता.
सीएनजी भरत असतानाच संबंधित व्यक्ती सिगरेट ओढत असल्याचे पंपावरील कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर बाब असल्याने कर्मचाऱ्याने त्यांना “येथे सिगरेट पिऊ नका” अशी विनंती केली.
मात्र, या सूचनेचा राग येऊन पवार आणि त्याच्या साथीदारांनी संतापाच्या भरात कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


🟥 ज्वलनशील ठिकाणी निष्काळजीपणा; मोठा अपघात टळला
सीएनजी पंपावर सिगरेट ओढण्याचा प्रकार अत्यंत धोकादायक मानला जातो. आरोपींच्या निष्काळजी आणि बेजबाबदार वर्तनामुळे मोठा स्फोट किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
या प्रकारामुळे पंपावरील इतर कर्मचारी व नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
🟥 पोलिसांची धाव; चौघांना ताब्यात
घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि चौघांनाही ताब्यात घेतले. पंपावरील कर्मचारी संचेती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


🟥 शिर्डीत वाढती दादागिरी? नागरिकांमध्ये नाराजी
या घटनेनंतर शिर्डी शहरात बाहेरून येणाऱ्या काही व्यक्तींकडून वाढत्या दादागिरीबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. धार्मिक व शांतताप्रिय शहर म्हणून ओळख असलेल्या शिर्डीत अशा प्रकारच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
🟥 पुढील तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास शिर्डी पोलीस करत असून आरोपींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button