अहिल्यानगर : ह्युमन राईट्स इंटरनॅशनल असोसिएशन, नवी दिल्ली व भारत सरकार मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय मानवाधिकार असोसिएशनच्या अहिल्यानगर (उत्तर) जिल्हाध्यक्षपदी समाजसेवक प्रवीणभाऊ आल्हाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष विलासजी कांबळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करून प्रवीणभाऊ आल्हाट यांचा सन्मान करण्यात आला.
समाजातील वंचित, दुर्बल व अन्यायग्रस्त घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणे, तसेच गरजू नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रवीणभाऊ आल्हाट हे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची, जनसेवेची आणि मानवतावादी दृष्टिकोनाची दखल घेत असोसिएशनने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे.

अहिल्यानगर उत्तर जिल्ह्यात मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार यावेळी प्रवीणभाऊ आल्हाट यांनी व्यक्त केला. समाजातील अन्यायग्रस्त व्यक्तींना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, प्रवीणभाऊ आल्हाट यांच्या नियुक्तीबद्दल विविध सामाजिक, राजकीय व नागरिकांच्या स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या पुढील सामाजिक व मानवतावादी वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत.