Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरक्राईम

राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप

राहाता शहरात कायदा-सुव्यवस्थेचे अक्षरशः तीन तेरा वाजले असून गुन्हेगारांनी शहराला वेठीस धरल्याचे भयावह चित्र समोर येत आहे. हत्या, छेडछाड, भरदिवसा चोरी, दहशत आणि आता निष्पाप १४ वर्षीय मुलाला मोटारीखाली चिरडून ठार मारण्याच्या घटनेमुळे नागरिक हादरले आहेत. मात्र एवढ्या गंभीर घटनांनंतरही पोलीस प्रशासन सुस्तच असल्याचा आरोप करत नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी पोलिसांना थेट इशारा दिला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


“फिर्यादही घेत नाहीत”; राहाता पोलिसांवर संतप्त आरोप
१४ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर स्थानिक नागरिक फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात गेले असता “घरचे लोक पाहिजेत” असे कारण देत तक्रार दाखल करून घेण्यात टाळाटाळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्षांनी केला. “जनतेचे रक्षण करायचे की गुन्हेगारांचे?” असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होत आहे. पोलिसांच्या या भूमिकेमुळे राहात्यात गुन्हेगारांचे मनोबल प्रचंड वाढल्याची चर्चा शहरभर सुरू आहे.
महिलांमध्ये भीतीचे वातावरण; गुन्हेगार मोकाट
राहाता शहरातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली असून संध्याकाळनंतर बाहेर पडताना नागरिकांना भीती वाटत आहे. छेडछाड, दादागिरी आणि दहशतीच्या घटनांमुळे शहरातील वातावरण बिघडले आहे. “पोलीस ठाण्याचा गुन्हेगारांवर जरबच उरलेला नाही,” असा थेट आरोप करत नगराध्यक्षांनी निष्क्रिय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.


“आता राज्य सुरक्षा बल रस्त्यावर उतरणार”
भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे यांच्या संकल्पनेतून राहाता नगर परिषदेला महाराष्ट्र राज्य सुरक्षा बलाचे स्वतंत्र सुरक्षा पथक मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिर्डीनंतर राहाता शहरात हे विशेष पथक गस्त घालणार असून महिलांच्या सुरक्षेसह गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोर पावले उचलली जाणार आहेत.
“पोलिसांनी सुधरावं, नाहीतर जनआंदोलन होईल!”
नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, “राहाता शहरातील वाढती गुन्हेगारी आणि पोलिसांची निष्क्रियता आता सहन केली जाणार नाही. जर गुन्हेगारांवर वचक बसवला नाही, तर नगर परिषद पदाधिकारी आणि नागरिक रस्त्यावर उतरून तीव्र लोकशाही आंदोलन छेडतील.”
राहात्यात आता जनतेचा संताप उफाळून आला असून, “पोलीस जागे होणार की जनता रस्त्यावर उतरणार?” असा सवाल नागरिक विचारत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button