Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
क्राईमशिर्डी

डिझेल चोरांच्या पाठीराख्यांवर कारवाई कधी? नागरिकांचा पोलीस अधीक्षकांना सवाल

समृद्धी महामार्गावर प्रवाशांची लूटमार आणि डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा महामार्ग पोलिसांनी पर्दाफाश केला असला, तरी या टोळीमागील खरे सूत्रधार अद्याप समोर आलेले नाहीत. एका आरोपीला अटक झाली असून सहा जण फरार आहेत.
शिर्डी कनेक्शनच्या चर्चांना उधाण
या गुन्ह्यात वापरण्यात आलेली कार्यपद्धती, आरोपींचे संपर्क आणि स्थानिक पातळीवरील काही धागेदोरे लक्षात घेता या टोळीचे संबंध शिर्डी परिसराशी असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


फक्त प्यादी जेरबंद, मास्टरमाईंड अद्याप फरार?
कारवाईत एका आरोपीला अटक झाली असली तरी टोळीचे नेतृत्व करणारे आणि गुन्ह्याचे नियोजन करणारे मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील संपूर्ण सत्य तपासातूनच पुढे येणार आहे.
सखोल तपासाची मागणी
महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या या प्रकरणाचा सर्वंकष तपास करून टोळीच्या आर्थिक व गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


पोलिसांचे शौर्य कौतुकास्पद, पण प्रश्न अनुत्तरित
180 किमी प्रतितास वेगाने पळणाऱ्या आरोपींचा पाठलाग करून एका आरोपीला पकडणे ही निश्चितच धाडसी कामगिरी आहे. मात्र फरार आरोपी आणि संभाव्य सूत्रधारांचा शोध लागेपर्यंत या प्रकरणातील अनेक प्रश्न अनुत्तरित राहणार आहेत.

समृद्धी महामार्गावरील डिझेल चोरी आणि लूटमार प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली असली, तरी यापूर्वीही शिर्डी परिसरातील काही टोळ्यांवर अशाच प्रकारच्या डिझेल चोरी, लूटमार आणि इतर गुन्ह्यांचे आरोप झाले होते. अनेक आरोपींना अटक करून त्यांच्याविरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.


मात्र, केवळ प्रत्यक्ष गुन्हा करणाऱ्यांवरच नव्हे तर अशा टोळ्यांना आर्थिक, सामाजिक किंवा अन्य प्रकारचे पाठबळ देणाऱ्या व्यक्तींचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. जर तपासात कोणत्याही व्यक्तीने आरोपींना मदत केल्याचे, आश्रय दिल्याचे किंवा गुन्हेगारी कारवायांना प्रोत्साहन दिल्याचे निष्पन्न झाले, तर त्यांच्यावरही कठोर कारवाई व्हावी, अशी भावना व्यक्त केली जात आहे.


यामुळे आता या प्रकरणाचा तपास किती खोलवर जाऊन होतो आणि गुन्हेगारांना मदत करणाऱ्या संभाव्य व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाते का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पोलीस अधीक्षक या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करतील का? असा प्रश्न परिसरातून उपस्थित केला जात आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button