Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
राजकीयशिर्डी

श्री साईचरणी १५ लाख रुपयांचा हिरेजडित मोरपिसाकार ब्रोच अर्पण-साईभक्ताच्या श्रद्धेला सुवर्णस्पर्श

श्री साईचरणी १५ लाख रुपयांचा हिरेजडित मोरपिसाकार ब्रोच अर्पण; साईभक्ताच्या श्रद्धेला सुवर्णस्पर्श
शिर्डी : श्री साईबाबांवरील अपार श्रद्धा आणि भक्तीभाव व्यक्त करत एका साईभक्ताने आज श्री साईचरणी अंदाजे १५ लाख रुपये किंमतीचा हिरेजडित मोरपिसाच्या आकाराचा आकर्षक ब्रोच अर्पण केला. ७६ ग्रॅम २७० मिलीग्रॅम वजनाचा हा मौल्यवान ब्रोच उत्कृष्ट नक्षीकाम आणि हिऱ्यांच्या देखण्या जडावामुळे विशेष आकर्षण ठरला आहे.
देश-विदेशातून लाखो भाविक दररोज श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येत असतात. साईबाबांप्रती असलेल्या अढळ श्रद्धेतून भाविक विविध प्रकारच्या देणग्या अर्पण करतात. त्याच भक्तीभावातून ही अनमोल भेट साईचरणी समर्पित करण्यात आली असून, ती साईभक्ताच्या निस्सीम श्रद्धेचे प्रतीक मानली जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


देणगी स्वीकारल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साईभक्ताचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. संस्थान प्रशासनाने देणगीची आवश्यक नोंद करून ती नियमानुसार स्वीकारली.

विशेष म्हणजे, देणगीदार साईभक्ताने स्वतःची ओळख गोपनीय ठेवण्याची विनंती केल्याने संस्थानकडून त्यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. मात्र, साईबाबांवरील श्रद्धेपोटी अर्पण करण्यात आलेली ही मौल्यवान देणगी सध्या भाविकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button