Letest News
राहत्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट ! पीआय सरोदे यांच्यासमोर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान लक्ष्मी नगरच्या विकासकामांना गती- ड्रेनेज समस्येवर अखेर कायमस्वरूपी उपाययोजनेचा शुभारंभ “इतना सन्नाटा क्यूँ छाया है…?” खरात प्रकरणात नेमकं कोणाला वाचवलं जातंय? समता पतसंस्थेतील व्यवहारांवर... राहता पोलीस ठाण्यात कायदा झोपला होता का?” — निष्क्रिय पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांच्या कारभारावर ... ऑनलाईन औषध विक्रीविरोधात २० मे रोजी देशव्यापी बंद- जिल्ह्यातील सर्व केमिस्टनी बंदमध्ये सहभागी व्हावे... भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले; दत्ता कराळे यांची बदली-खरातसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलीस वर्तुळ... “ओडीसाच्या साईभक्तेकडून साईचरणी सुवर्ण अर्पण ७.५६ लाखांचे आकर्षक सोन्याचे ब्रोच भेट” गर्भलिंग चाचणी रॅकेटमध्ये पुण्यातील तीन जण अटकेत -बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन पुरवठा प्रकरणात कारवाई निष्क्रिय अधिकारी नितीन चव्हाण यांच्या कार्यकाळात गुन्हेगारीने गाठला उच्चांक-राहता शहराची बिघडलेली प... “द्वारकामाईत भक्तांना दिलासा-राजेंद्र कोते पाटील यांच्या मागणीला प्रशासनाचा तात्काळ प्रतिसाद”
अ.नगरक्राईम

“कायदा राखणारेच झाले लाचखोर!” — पाथर्डीत पोलीसांचा काळा चेहरा उघड

अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये घडलेली घटना म्हणजे कायदा आणि व्यवस्थेवरच काळा डाग ठरली आहे. नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलीसच आता लाचखोरीच्या दलदलीत खोलवर बुडाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


अपघात प्रकरणात मदत करण्याच्या नावाखाली बिट हवालदार अभय लबडे यांनी तक्रारदाराकडून थेट ७,००० रुपयांची मागणी केली. “गाडी सोडवतो, केस मॅनेज करतो, कोर्टात मदत करतो” अशा गोड बोलांनी सुरू झालेला हा व्यवहार शेवटी ५,००० रुपयांवर येऊन थांबला — पण ACBच्या जाळ्यात अडकला!
दि. २९ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला आणि पाथर्डी पोलीस स्टेशनच्या आतच हा घाणेरडा व्यवहार उघडकीस आला. आरोपीने तक्रारदाराकडून ५,००० रुपये स्वीकारले आणि लगेचच ती रक्कम आपल्या मदतनिस ज्ञानेश्वर सानप याच्याकडे सुपूर्द केली. म्हणजेच, लाचखोरीचा हा “टीमवर्क” असल्याचा संशय अधिक गडद झाला आहे.


👉 अपघातातून सुटका नाही, लाच दिल्याशिवाय मार्ग नाही!
मढी गावाजवळ झालेल्या अपघातानंतर, न्याय मिळवण्याऐवजी तक्रारदाराला लाचेच्या जाळ्यात ओढले गेले. “कायदा” दाखवून नागरिकांना लुबाडण्याचा हा प्रकार संतापजनक आहे.
👉 पोलीस स्टेशनच बनले वसुलीचे अड्डे?
घटना थेट पोलीस स्टेशनच्या कक्षात घडली, यामुळे प्रश्न उपस्थित होतो — सामान्य नागरिक सुरक्षित तरी कुठे आहे?
👉 ACBचा सापळा आणि भ्रष्टाचारावर घाव
पोलीस उपअधीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई पार पडली. आरोपींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
👉 नागरिकांनो, भीती सोडा — आवाज उठा!
लाच मागणाऱ्यांविरुद्ध तक्रार करा. १०६४ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधा आणि भ्रष्टाचाराला थेट आव्हान द्या.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button