Letest News
मायेची सावली हरपली! आदर्श माता वत्सलाबाई गडकरी काळाच्या पडद्याआड साईभक्तीचा अनोखा सेवाभाव! पुण्यातील चौगुले कुटुंबीयांकडून साईसंस्थानला १२ लाख ८४ हजारांची भरघोस देणग... मंदिर व्यवस्थापन आता केवळ परंपरेपुरते नाही-आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचीही गरज – गोरक्ष गाडीलकर मुख्यमंत्र्यांचा जीआर निघाला-मग शिर्डी मतदारसंघातील गोरगरीबांना सातबारा कधी मिळणार? डॉ. राजेंद्र पिप... शेजाऱ्याच्या कुंपणाचा दाखला देणाऱ्या सुजय विखेंनी जनतेच्या प्रश्नांच्या कुंपणात अडकू नये टीकेला उत्त... १५ वर्षांच्या शोषणाचा गंभीर आरोप-माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यावर बलात्काराचा गुन्... शिवसेनेच्या पदाधिकारी निवडीसाठी २३ व २४ नोव्हेंबरला मुलाखती जिल्हा प्रमुख कमलाकर कोते मला सहा महिन्यांसाठी गृहमंत्री करा-सगळ्यांच्या बत्त्या गुल करतो!” श्री द्वारकामाईत तुळशी-विष्णू विवाहाचा मंगल सोहळा भक्तिभावात संपन्न! रोग्य केंद्रात औषधांचा भोंगळ कारभार! रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे काय?
राजकीयशिर्डी

मुख्यमंत्र्यांचा जीआर निघाला-मग शिर्डी मतदारसंघातील गोरगरीबांना सातबारा कधी मिळणार? डॉ. राजेंद्र पिपाडांचा मुख्यमंत्र्यांसमोर थेट सवाल!

शिर्डी | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

गोरगरीबांच्या डोक्यावरचे छप्पर वाचविण्यासाठी राज्य शासनाने २५ मार्च २०२६ रोजी २०११ पूर्वीच्या शासकीय जागांवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासंदर्भात शासन निर्णय (जीआर) जारी केला. मात्र, शासनाचा निर्णय होऊनही शिर्डी विधानसभा मतदारसंघातील पात्र रहिवाशांना अद्याप सातबारा उतारा मिळत नसेल, तर या निर्णयाचा प्रत्यक्ष फायदा गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचणार तरी कधी? असा थेट आणि महत्त्वपूर्ण सवाल भाजपा नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी उपस्थित केला आहे.

याच प्रश्नावर डॉ. पिपाडा यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची समक्ष भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. राज्यभर महसूल विभागामार्फत विशेष सर्वेक्षण मोहीम राबवून २०११ पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या निवासी अतिक्रमणांची नोंद करावी, शिर्डी मतदारसंघातील पात्र कुटुंबांना शासन निर्णयाचा लाभ द्यावा आणि नियमानुसार जमीन अभिलेखांमध्ये नोंदी करून सातबारा उतारे उपलब्ध करून द्यावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. यावेळी त्यांच्यासमवेत कन्या ट्विंकल पिपाडा उपस्थित होत्या.

DN SPORTS

kamlakar

६०-७० वर्षांपासून वास्तव्य; तरीही घरावर बेघर होण्याची टांगती तलवार!

शिर्डी विधानसभा मतदारसंघासह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दलित, वंचित, अल्पसंख्याक आणि उपेक्षित घटकांतील हजारो गरीब कुटुंबे गेल्या ६० ते ७० वर्षांपासून शासकीय जागांवर निवासी स्वरूपात वास्तव्यास आहेत. अनेक कुटुंबांच्या तीन-तीन पिढ्या याच घरांमध्ये वाढल्या. आयुष्यभराच्या कष्टातून, घाम गाळून आणि पै-पै साठवून त्यांनी आपली घरे उभी केली. मात्र, गेल्या दोन वर्षांत शिर्डी व परिसरात अशा निवासी अतिक्रमणांवर झालेल्या कारवायांमुळे अनेक कुटुंबांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले.

ज्या घरांना या कुटुंबांनी आपले सर्वस्व मानले, त्याच घरांवर बेघर होण्याचे संकट उभे राहिले. हा प्रश्न केवळ अतिक्रमणाचा नसून अनेक वर्षांपासून वास्तव्य करणाऱ्या गरीब कुटुंबांच्या निवाऱ्याचा आणि त्यांच्या जगण्याच्या सुरक्षिततेचा आहे. ही बाब लक्षात घेऊन डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी यापूर्वीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्य शासनाने २५ मार्च २०२६ रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी केला.

शासनाचा निर्णय झाला; मग महसूल विभागाची पावले का थांबली?

मुख्यमंत्र्यांनी संवेदनशीलतेने घेतलेल्या निर्णयामुळे हजारो कुटुंबांच्या मनात आशेचा किरण निर्माण झाला. मात्र, शासन निर्णय जारी होऊनही शिर्डी मतदारसंघात त्याची अपेक्षित गतीने अंमलबजावणी होत नसल्याची बाब डॉ. पिपाडा यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

गोदावरी वसाहत-साकुरी, राहाता येथील सर्व्हे नं. ३४०, शिर्डी शहरातील विविध ठिकाणे तसेच मतदारसंघातील इतर भागांमध्ये २०११ पूर्वीपासून रहिवासी वास्तव्यास असूनही अद्याप त्यांच्या नावावर सातबारा उतारे झालेले नाहीत. विशेष म्हणजे काही कुटुंबे १९७५ पासून संबंधित ठिकाणी वास्तव्यास असल्याची बाबही निवेदनातून मांडण्यात आली.

अनेक नागरिकांनी ग्रामपंचायत, नगरपरिषद आणि संबंधित स्थानिक प्रशासनाकडे अर्ज सादर केले आहेत. मात्र, प्रत्यक्ष कार्यवाहीचा वेग अत्यंत संथ असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम आणि नाराजी आहे. झोपडपट्टी व वंचित वस्त्यांमधील अनेक गरीब नागरिकांना शासनाच्या या जीआरची माहितीही नसल्याने ते या निर्णयाच्या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासन निर्णय केवळ कागदावर न राहता तो प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे.

राज्यभर विशेष सर्वेक्षण मोहीम राबविण्याची मागणी

डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या निवेदनात काही महत्त्वपूर्ण मागण्या मांडल्या आहेत.

१. राज्यभर महसूल विभागामार्फत विशेष सर्वेक्षण मोहीम राबवून २०११ पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या निवासी अतिक्रमणांची नोंद घ्यावी.

२. गोदावरी वसाहत-साकुरी, राहाता सर्व्हे नं. ३४०, शिर्डी शहर आणि मतदारसंघातील इतर पात्र निवासी वस्त्यांचे सर्वेक्षण तातडीने करावे.

३. ग्रामपंचायत व नगरपरिषद स्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जांवर तातडीने कार्यवाही करावी.

४. शासन निर्णयातील निकषांनुसार पात्र कुटुंबांचे निवासी अतिक्रमण नियमित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.

५. संबंधित जमीन अभिलेखांमध्ये आवश्यक नोंदी करून नियमानुसार पात्र लाभार्थ्यांना सातबारा उतारे उपलब्ध करून द्यावेत.

६. शासन निर्णयाची माहिती वंचित वस्त्यांमधील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी विशेष जनजागृती मोहीम राबवावी.

मुख्यमंत्र्यांचा निवेदनावर शेरा; संबंधितांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

डॉ. पिपाडा यांनी मुख्यमंत्र्यांसमोर केवळ मागणी न मांडता शासन निर्णय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील तफावतही स्पष्टपणे मांडली. गोरगरीब कुटुंबांच्या घरांचा प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित राहू नये, पात्र नागरिकांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळावा आणि महसूल विभागाच्या स्तरावर विशेष मोहीम राबवून हा प्रश्न मार्गी लावावा, अशी भूमिका त्यांनी मांडली.

या निवेदनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेरा मारून संबंधितांना तातडीने कार्यवाही करण्याबाबत निर्देश दिल्याचे डॉ. पिपाडा यांनी सांगितले.

घर म्हणजे केवळ बांधकाम नव्हे, तर पिढ्यान् पिढ्यांच्या संघर्षाची कमाई!

अनेक गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांनी आयुष्यभराची पुंजी खर्च करून आपली घरे उभी केली आहेत. त्या घरांच्या भिंतींमध्ये त्यांच्या कष्टांचा इतिहास, मुलांचे बालपण आणि अनेक पिढ्यांच्या आठवणी दडलेल्या आहेत. त्यामुळे अशा कुटुंबांना न्याय देणे ही केवळ प्रशासकीय प्रक्रिया नसून सामाजिक बांधिलकी आहे.

शासनाने निर्णय घेतला, मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली, आता महसूल प्रशासनानेही त्याच संवेदनशीलतेने पुढाकार घेण्याची गरज आहे. शासन निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून पात्र कुटुंबांच्या घरांना कायदेशीर सुरक्षितता मिळणार का, याकडे आता शिर्डी मतदारसंघातील हजारो नागरिकांचे लक्ष लागले आहे.


: डॉ. राजेंद्र पिपाडा यांची स्पष्ट भूमिका

“गोरगरीब माणसाच्या डोक्यावरचे छप्पर वाचले पाहिजे आणि त्याला सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या मागणीची संवेदनशीलतेने दखल घेऊन २०११ पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांच्या नियमितीकरणासाठी शासन निर्णय जारी केला. मात्र, १९७५ पासून वास्तव्य करणाऱ्या कुटुंबांनाही अद्याप त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळालेला नाही. गोदावरी वसाहत-साकुरी, राहाता सर्व्हे नं. ३४०, शिर्डी आणि मतदारसंघातील इतर ठिकाणच्या पात्र रहिवाशांना सातबारा उतारे मिळणे आवश्यक आहे. यासाठी विशेष सर्वेक्षण मोहीम राबवून शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनी निवेदनावर शेरा मारून संबंधितांना तातडीने कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. गोरगरीबांच्या घरांचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आमचा पाठपुरावा सुरूच राहील.”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button