Letest News
मायेची सावली हरपली! आदर्श माता वत्सलाबाई गडकरी काळाच्या पडद्याआड साईभक्तीचा अनोखा सेवाभाव! पुण्यातील चौगुले कुटुंबीयांकडून साईसंस्थानला १२ लाख ८४ हजारांची भरघोस देणग... मंदिर व्यवस्थापन आता केवळ परंपरेपुरते नाही-आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचीही गरज – गोरक्ष गाडीलकर मुख्यमंत्र्यांचा जीआर निघाला-मग शिर्डी मतदारसंघातील गोरगरीबांना सातबारा कधी मिळणार? डॉ. राजेंद्र पिप... शेजाऱ्याच्या कुंपणाचा दाखला देणाऱ्या सुजय विखेंनी जनतेच्या प्रश्नांच्या कुंपणात अडकू नये टीकेला उत्त... १५ वर्षांच्या शोषणाचा गंभीर आरोप-माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यावर बलात्काराचा गुन्... शिवसेनेच्या पदाधिकारी निवडीसाठी २३ व २४ नोव्हेंबरला मुलाखती जिल्हा प्रमुख कमलाकर कोते मला सहा महिन्यांसाठी गृहमंत्री करा-सगळ्यांच्या बत्त्या गुल करतो!” श्री द्वारकामाईत तुळशी-विष्णू विवाहाचा मंगल सोहळा भक्तिभावात संपन्न! रोग्य केंद्रात औषधांचा भोंगळ कारभार! रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे काय?
राजकीयशिर्डी

मंदिर व्यवस्थापन आता केवळ परंपरेपुरते नाही-आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचीही गरज – गोरक्ष गाडीलकर

शिर्डी | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

मंदिर म्हणजे केवळ धार्मिक विधी आणि दर्शनाचे ठिकाण नव्हे, तर लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आणि व्यापक व्यवस्थापनाची जबाबदारी असलेली महत्त्वपूर्ण व्यवस्था आहे. त्यामुळे मंदिर व्यवस्थापनात धार्मिक परंपरांचे जतन करतानाच आधुनिक व्यवस्थापनशास्त्र, अत्याधुनिक तंत्रज्ञान, आर्थिक पारदर्शकता आणि सेवाभाव यांची सांगड घालणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले.

मुंबई येथील एस.पी. मंडळी संचालित वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या ‘टेंपल मॅनेजमेंट’ अभ्यासक्रमाचा पदवीदान सोहळा शिर्डीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी मंदिर व्यवस्थापनाच्या क्षेत्रात प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने या अभ्यासक्रमाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

DN SPORTS

kamlakar

या सोहळ्यास श्री साईबाबा संस्थानचे माजी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, एस.पी. मंडळीचे अध्यक्ष ॲड. सदानंद फडके, उपाध्यक्ष राजेंद्र पवार, समूह सल्लागार प्रा. डॉ. उदय साळुंखे, वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे संचालक प्रा. डॉ. कौस्तुभ डागलकर आणि टेंपल कनेक्टचे संस्थापक गिरीश कुलकर्णी उपस्थित होते.

मंदिर व्यवस्थापनात तंत्रज्ञान आणि नियोजन हवे!

गाडीलकर यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, मंदिर व्यवस्थापनात धार्मिक विधी आणि दर्शन व्यवस्था जितकी महत्त्वाची आहे, तितकेच गर्दी नियंत्रण, भाविकांची सुरक्षा, स्वच्छता, आरोग्यसेवा आणि आर्थिक व्यवस्थापनही महत्त्वाचे आहे. लाखो भाविकांची ये-जा असलेल्या मंदिरांमध्ये सक्षम नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्यास व्यवस्थापन अधिक गतिमान, पारदर्शक आणि कार्यक्षम होऊ शकते.

या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना मंदिर व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी श्री साईबाबा संस्थानच्या माध्यमातून इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी संस्थानच्या विविध सेवाभावी उपक्रमांचीही माहिती दिली.

समर्पण आणि पारदर्शकतेशिवाय मंदिर व्यवस्थापन अपूर्ण!

ॲड. सदानंद फडके यांनी मंदिर व्यवस्थापनात समर्पण, सेवाभाव आणि आर्थिक पारदर्शकता या बाबी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. तर डॉ. सुरेश हावरे यांनी मंदिरांमुळे पर्यटन, वाहतूक, निवास व्यवस्था आणि स्थानिक व्यापाराला चालना मिळत असून, त्यातून रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत असल्याचे स्पष्ट केले.

पहिल्या तुकडीत १८ विद्यार्थ्यांचा सहभाग!

प्रा. डॉ. उदय साळुंखे यांनी अभ्यासक्रमाची माहिती देताना पहिल्या तुकडीत १८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचे सांगितले. तीन महिन्यांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणासह विद्यार्थ्यांनी शिर्डी, शेगाव, सोलापूर आणि तुळजापूर यांसह विविध धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास केला.

अयोध्येच्या राममंदिर न्यासाकडूनही शिर्डीच्या व्यवस्थापनाचे कौतुक!

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एअर मार्शल (निवृत्त) जितेंद्र मिश्रा यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. शिर्डी संस्थानची व्यवस्थापन पद्धती, भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा आणि देणगी व्यवस्थापनाची कार्यपद्धती अन्य धार्मिक संस्थांसाठीही मार्गदर्शक ठरू शकते, असे त्यांनी नमूद केले.

यावेळी श्री साईबाबा संस्थानचे प्र. उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, वेलिंगकर इन्स्टिट्यूटचे शिक्षक, विद्यार्थी तसेच मान्यवर उपस्थित होते.

मंदिर व्यवस्थापनाला व्यावसायिक कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि सेवाभावाची जोड देणारा हा अभ्यासक्रम भविष्यात देशातील धार्मिक संस्थांसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button