Letest News
मायेची सावली हरपली! आदर्श माता वत्सलाबाई गडकरी काळाच्या पडद्याआड साईभक्तीचा अनोखा सेवाभाव! पुण्यातील चौगुले कुटुंबीयांकडून साईसंस्थानला १२ लाख ८४ हजारांची भरघोस देणग... मंदिर व्यवस्थापन आता केवळ परंपरेपुरते नाही-आधुनिक व्यवस्थापनशास्त्राचीही गरज – गोरक्ष गाडीलकर मुख्यमंत्र्यांचा जीआर निघाला-मग शिर्डी मतदारसंघातील गोरगरीबांना सातबारा कधी मिळणार? डॉ. राजेंद्र पिप... शेजाऱ्याच्या कुंपणाचा दाखला देणाऱ्या सुजय विखेंनी जनतेच्या प्रश्नांच्या कुंपणात अडकू नये टीकेला उत्त... १५ वर्षांच्या शोषणाचा गंभीर आरोप-माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यावर बलात्काराचा गुन्... शिवसेनेच्या पदाधिकारी निवडीसाठी २३ व २४ नोव्हेंबरला मुलाखती जिल्हा प्रमुख कमलाकर कोते मला सहा महिन्यांसाठी गृहमंत्री करा-सगळ्यांच्या बत्त्या गुल करतो!” श्री द्वारकामाईत तुळशी-विष्णू विवाहाचा मंगल सोहळा भक्तिभावात संपन्न! रोग्य केंद्रात औषधांचा भोंगळ कारभार! रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे काय?
राजकीयशिर्डी

साईभक्तीचा अनोखा सेवाभाव! पुण्यातील चौगुले कुटुंबीयांकडून साईसंस्थानला १२ लाख ८४ हजारांची भरघोस देणगी

शिर्डी | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

श्री साईबाबांवरील अढळ श्रद्धा, भक्तिभाव आणि सेवाभावाची अनोखी प्रचिती पुणे येथील चौगुले कुटुंबीयांनी दिली आहे. पुणे येथील साईभक्त श्री. उदयकुमार गोविंदराव चौगुले व त्यांच्या कुटुंबीयांनी श्री साईबाबा संस्थानला तब्बल १२ लाख ८४ हजार ४९७ रुपये मूल्याची देणगी अर्पण करून साईदरबारी आपले योगदान नोंदविले आहे.

या देणगीमध्ये श्री. उदयकुमार चौगुले यांनी संस्थानला ५ लाख ४४ हजार ५०० रुपये किमतीचे निकॉन कंपनीचे Z6-II मॉडेलचे २४-१२० एमएम लेन्ससह तीन अत्याधुनिक कॅमेरा किट अर्पण केले आहेत.

DN SPORTS

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या अविस्मरणीय आठवणी छायाचित्रांच्या माध्यमातून जतन व्हाव्यात, या उद्देशाने संस्थानच्या वतीने छायाचित्र सेवा सुरू करण्यात आली आहे. या भाविकाभिमुख उपक्रमाचे महत्त्व ओळखून ही सेवा अधिक सक्षम व्हावी, तसेच जास्तीत जास्त भाविकांना त्याचा लाभ मिळावा, या उदात्त हेतूने चौगुले यांनी आधुनिक कॅमेरे देणगी स्वरूपात दिले आहेत.

kamlakar

विशेष म्हणजे, चौगुले कुटुंबीयांनी केवळ आधुनिक कॅमेऱ्यांची देणगी देऊनच आपले योगदान मर्यादित ठेवले नाही, तर संस्थानच्या विविध सेवाभावी उपक्रमांनाही आर्थिक मदतीचा हात दिला आहे. वैद्यकीय सेवा, अन्नदान, कोठी (धूप-दीप), साई सत्यव्रत (सत्यनारायण), बांधकाम आणि शिक्षण अशा विविध निधींसाठी त्यांनी एकूण ७ लाख ३९ हजार ९९७ रुपयांची देणगी अर्पण केली आहे.

चौगुले कुटुंबीयांच्या या भक्तिपूर्ण आणि सेवाभावी योगदानाबद्दल श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

साईसेवेतून भक्तीचा प्रत्यय!

साईबाबांच्या दरबारात अर्पण केलेली ही देणगी केवळ आर्थिक स्वरूपाची नसून, भाविकांची सेवा अधिक प्रभावी आणि सुविधाजनक व्हावी, या उदात्त भावनेतून केलेले योगदान आहे. चौगुले कुटुंबीयांच्या या दातृत्वातून साईभक्ती, सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम पाहायला मिळत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button