Letest News
शेजाऱ्याच्या कुंपणाचा दाखला देणाऱ्या सुजय विखेंनी जनतेच्या प्रश्नांच्या कुंपणात अडकू नये टीकेला उत्त... १५ वर्षांच्या शोषणाचा गंभीर आरोप-माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यावर बलात्काराचा गुन्... शिवसेनेच्या पदाधिकारी निवडीसाठी २३ व २४ नोव्हेंबरला मुलाखती जिल्हा प्रमुख कमलाकर कोते मला सहा महिन्यांसाठी गृहमंत्री करा-सगळ्यांच्या बत्त्या गुल करतो!” श्री द्वारकामाईत तुळशी-विष्णू विवाहाचा मंगल सोहळा भक्तिभावात संपन्न! रोग्य केंद्रात औषधांचा भोंगळ कारभार! रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू आहे काय? शिर्डीत ७० व्या राष्ट्रीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ! शाम जमन गिरि गोस्वामी यांची अखिल भारतीय गोस्वामी समाजाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती! शिर्डीत प्रामाणिकपणाचे पुन्हा एकदा दर्शन! अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या नवनियुक्त सीईओंची शिर्डीत सदिच्छा भेट!
अ.नगरराजकीय

शेजाऱ्याच्या कुंपणाचा दाखला देणाऱ्या सुजय विखेंनी जनतेच्या प्रश्नांच्या कुंपणात अडकू नये टीकेला उत्तर देण्याची हिंमत ठेवा! अभिजीत दिपकें

शिर्डी | प्रतिनिधी

sai nirman
जाहिरात

अभिजीत दिपके यांच्यावर टीका करताना भाजप नेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी शेजाऱ्याच्या कुंपणाचा दाखला देत केलेले वक्तव्य सध्या चर्चेत आहे. मात्र, विखे साहेबांना एक साधा प्रश्न विचारावासा वाटतो की, देशातील प्रश्नांवर आवाज उठवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने आधी आपल्या शेजाऱ्याचे कुंपण काढूनच दाखवावे, असा काही लोकशाहीचा नवा नियम तयार झाला आहे काय?

देशातील प्रश्नांवर बोलण्यासाठी कोणाचे प्रमाणपत्र घ्यावे लागते का? जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी राजकीय घराण्याचा वारसा लागतो का? आणि एखाद्याच्या आंदोलनाशी मतभेद असतील तर त्याला मुद्द्यांनी उत्तर देण्याऐवजी वैयक्तिक टोमणे मारणे, हीच राजकीय संस्कृती आहे काय?

DN SPORTS

kamlakar

विखे साहेब, टीका ऐकण्याचीही राजकीय ताकद असू द्या!

राजकारणात असताना स्तुतीचे हार स्वीकारायचे आणि टीका झाली की टीका करणाऱ्याच्या चारित्र्यावर, हेतूंवर आणि सामाजिक कार्यावर प्रश्न उपस्थित करायचे, ही भूमिका लोकशाहीला शोभणारी नाही. जनतेला नेत्यांची भाषणे नकोत, तर त्यांच्या प्रश्नांची उत्तरे हवी आहेत. विरोधात बोलणारा प्रत्येकजण चुकीचा आणि आपल्या बाजूने बोलणारा प्रत्येकजण योग्य, अशी राजकीय सोय जनतेला मान्य होणार नाही.

षडयंत्र आणि पैशांचा आरोप असेल तर पुरावे द्या; केवळ वक्तव्यांचा धुरळा नको!

अभिजीत दिपके यांच्या आंदोलनामागे पैसा आणि षडयंत्र असल्याचे विखे यांनी म्हटल्याचे वृत्त आहे. हा आरोप गंभीर आहे. मग त्यासंबंधी ठोस पुरावे जनतेसमोर मांडण्याची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. पुरावे असतील तर कायदेशीर मार्गाने पुढे या; नसतील तर एखाद्याच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी गंभीर शब्दांचा वापर कशासाठी?

राजकीय वारसा मोठा असला तरी जनतेच्या न्यायालयापेक्षा मोठा नाही!

लोकशाहीत कोणताही नेता प्रश्नांच्या पलीकडे नसतो. राजकीय घराणे, सत्ता, पद आणि प्रतिष्ठा या गोष्टी जनतेच्या विश्वासापेक्षा मोठ्या होऊ शकत नाहीत. जनतेने दिलेला अधिकार हा जनतेला जाब विचारण्यापासून रोखण्यासाठी नसतो, तर जनतेसमोर उत्तरदायी राहण्यासाठी असतो.

दैनिक साईदर्शनचा थेट सवाल!

सुजय विखे पाटील साहेब, अभिजीत दिपके यांच्याशी वैचारिक मतभेद असतील तर त्यांना मुद्द्यांनी उत्तर द्या. त्यांच्या आंदोलनातील त्रुटी असतील तर त्या पुराव्यांसह उघड करा. पण देशाला शहाणपण शिकवण्याचा अधिकार कोणाला आहे, हे ठरवण्याचा अधिकार कोणत्याही राजकीय नेत्याला नाही.

कारण देश कोणाच्या राजकीय मालकीचा नाही, लोकशाही कोणाच्या घराण्याची जहागिरी नाही आणि जनतेचा आवाज कोणाच्या वक्तव्याने बंद होणार नाही!

प्रश्न विचारणाऱ्यांना गप्प करण्यापेक्षा प्रश्नांना उत्तरे द्या; हाच खऱ्या लोकशाहीचा धर्म आहे!

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button