Letest News
मोठी राजकीय खळबळ! रुपाली चाकणकर यांचा राजीनामा-खरात प्रकरणाचा मोठा परिणाम शिर्डीत ‘4 एकर’चा स्फोटक घोटाळा-गहाण जमीन थेट विक्रीत-कोट्यवधींचा खेळ उघड! शिर्डीत श्री रामनवमी उत्सवाची भक्तीमय सांगता-दहिहंडी फोडत उत्सवाचा समारोप २ लाखांची लाच घेताना शिर्डीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रंगेहात- पुणे महसूल विभाग हादरला भोंदू बाबाशी नाव जोडल्याने केसरकर संतापले ‘राजकीय कट’ असल्याचा थेट आरोप!” “ओळख मान्य पण संबंध नाकारल... शिर्डी गॅस टंचाईप्रकरणी पुरवठा अधिकाऱ्यांना निवेदन 24 तासांचा अल्टिमेटम समीर वीर आक्रमक शिर्डीत भव्य नेत्र तपासणी शिबिर- १५० रुग्णांना दिलासा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत शिर्डीत ‘भोंदू बाबाचा’ काळा साम्राज्य उघड! श्रद्धा अश्लील व्हिडिओ-खंडणी आणि बलात्काराचा थरारक गुन्हे... महिलांचे नाव उघड करू नये-कोपरगावात गुन्हा दाखल पोलिसांचे आवाहन: पिडीतांची ओळख जाहीर केल्यास कठोर कार... अहिल्यानगरमध्ये सुट्या पेट्रोल-डिझेल विक्रीवर बंदी जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश
अ.नगरक्राईम

घुलेवाडी येथील दोन तरुणांनी साधूंना केली मारहाण

चार साधूंना दोन तरुणांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. या जखमी साधूंवर घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात औषधोपचार सुरू आहेत. सोमवारी दुपारी कैलास रंगनाथ शिंदे (वय 68, रा. रामवाडी, अहिल्यानगर), मल्हारी दादू चांदणे (वय 45, रा. रामवाडी, अहिल्यानगर), बबन देवराम जाधव (वय 70, रा. देहरे, अहिल्यानगर) व विलास मारुती वडागळे (वय 48) हे चार साधू नवीन नगर रस्त्याच्या दिशेने येत होते.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दोन तरुणांनी त्यांना रस्त्यातच थांबवले. त्यांच्याशी काहीवेळ संवाद केल्यानंतर अचानक साधूंना मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा ते जीव वाचवण्यासाठी इकडे-तिकडे पळण्यासाठी प्रयत्न करु लागले. हा प्रकार रस्त्याने ये-जा करणार्‍यांनी बघितल्यावर साधूंना धीर देत औषधोपचारासाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, या घटनेची माहिती समजताच हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. याचबरोबर शहराचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख रुग्णालयात आले होते.

या साधूंना का मारहाण करण्यात आली हे मात्र समजू शकले आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच निंबाळे चौफुलीवर बापलेकीला मारहाण झाली होती. हे वातावरण कुठे शांत होत नाही तर आता शहरात दोन तरुणांनी साधूंना मारहाण केली आहे. यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे.

पोलिसांनी याची गांभीर्याने दखल घेतली असून, पसार आरोपींचा शोध सुरू केला असून दोघांची ओळख पटवण्यात यश आले आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button