Letest News
शिर्डीत रिक्षातून वृद्धाची लूट सराईत गुन्हेगार रहीम पठाणसह दोघांना २ दिवसांची पोलीस कोठडी समता घोटाळा : व्यवस्थापकाला पोलीस कोठडी आता 'मोठ्या माश्या'वर कारवाई कधी? शिर्डीत मजुरांच्या खोलीत घरफोडी चार मोबाईलसह ₹65 हजारांचा ऐवज लंपास शिर्डीत रिक्षातून वृद्ध शेतकऱ्याची लूट- सराईत शंकर चौधरी ऊर्फ रहीम पठाण जेरबंद डॉ. मीरा ढास यांनी स्वीकारला शिर्डी येथील माहिती अधिकारी पदाचा कार्यभार मोहरा अटकेत… पण सूत्रधारापर्यंत तपास कधी?व्यवस्थापकाला बेड्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रश्... साईचरणी प्रामाणिकतेचा आदर्श! गाभाऱ्यात सापडलेले ३४९० भाविक महिलेला सुखरूप परत दिवसाढवळ्या घरफोडी कुलूप तोडून घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा
अ.नगरक्राईम

पोलीस निरीक्षकांवरच हल्ला सिद्धटेकमध्ये सरकारी कर्तव्य बजावताना खाकीवर उघड आव्हान

कर्जत (प्रतिनिधी):
सरकारी कामकाजासाठी सिद्धटेक (ता. कर्जत) येथे गेलेल्या कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत थेट मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ६) सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडली. या प्रकरणी अनिल पांडुरंग पवार (रा. फोताळे, ता. मोहोळ, जि. सोलापूर; सध्या रा. अंबालिका कारखाना, ता. कर्जत) याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलीस निरीक्षकांची कॉलर पकडून धक्काबुक्की
कर्मचाऱ्यांनाही मारहाण, शिवीगाळ
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंगारकी चतुर्थीनिमित्त उमाजी चौक, सिद्धटेक येथे बंदोबस्तासाठी पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट व पोलीस कर्मचारी सचिन भीमराव झुनगुरे हे शासकीय कर्तव्य बजावत असताना आरोपी अनिल पवार याने अचानक आक्रमक होत शिरसाट यांच्याशी हुज्जत घातली. इतकेच नव्हे तर त्यांच्या कॉलरला हात घालत धक्काबुक्की केली.
हा प्रकार पाहून कर्मचारी झुनगुरे हे वाद सोडविण्यास गेले असता आरोपीने त्यांनाही धक्काबुक्की करत डोळ्यावर चापट मारली, कॉलर पकडली व मोठमोठ्याने शिवीगाळ करत सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला.
कायदा-सुव्यवस्थेची लक्तरे
“जेथे पोलीसच सुरक्षित नाहीत, तेथे जनता कशी सुरक्षित?”
या घटनेमुळे कर्जत तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मागील महिन्यात पोलिसांच्या कुटुंबीयांशी संबंधित गंभीर प्रकार उघडकीस आला असतानाच, आता थेट पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांवरच हात उचलला जात असल्याने गुन्हेगारी व टवाळखोरी किती बिनधास्त झाली आहे हे स्पष्ट होते.
“जेथे पोलीसच सुरक्षित नाहीत, तेथे सर्वसामान्य जनतेची काय अवस्था?” असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.
गुन्हा दाखल, आरोपी अटकेत
खाकीचा धाक निर्माण करण्याची जोरदार मागणी
या प्रकरणी पोलीस कर्मचारी सचिन झुनगुरे यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी अनिल पवार याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३२, ११५(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
दरम्यान, वाढत्या गुन्हेगारीवर लगाम घालण्यासाठी आणि पोलिसांवर हात उचलणाऱ्यांवर कडक कारवाई करून खाकीचा धाक निर्माण करावा, अशी ठाम मागणी आता सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button