Letest News
शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार
क्राईमशिर्डी

चाकूचा धाक दाखवून तरुणीला घेऊन पसार! भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण रोशन घेगडमलसह दोघांविरुद्ध तक्रार

सावळीविहीर : घरातील कुटुंबीय झोपेत असतानाच पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत १८ वर्षीय तरुणीला तिच्या परिचित तरुणाने मोटारसायकलवरून घेऊन गेल्याचा धक्कादायक प्रकार सावळीविहीर बु. येथे घडला. बहिणीला घेऊन जात असताना तिच्या भावाने विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, दोन साथीदारांनी चाकूचा धाक दाखवत त्याला धमकावले आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा गंभीर आरोप पोलिसांत दाखल तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिस तक्रारीनुसार, ५ सप्टेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास घराचा दरवाजा वाजल्याने तरुणीचा अल्पवयीन भाऊ झोपेतून उठून बाहेर आला. त्यावेळी घराबाहेर त्याची १८ वर्षीय बहीण, रोशन घेगडमल (रा. निमगाव को-हाळे, ता. राहाता) आणि त्याचे दोन अनोळखी साथीदार उभे असल्याचे त्याला दिसले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


क्षणाचाही विलंब न करता रोशन घेगडमल याने तरुणीला मोटारसायकलवर बसवून तेथून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद आहे. भावाने बहिणीला आवाज देत थांबविण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या दिशेने चाकू दाखवून धमकी देण्यात आली, तसेच त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. आरडाओरड ऐकून आई-वडील बाहेर येताच संशयितांनी तेथून पलायन केले.
घटनेनंतर नातेवाईकांनी तातडीने डायल ११२ वर संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तरुणीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला; मात्र ती आढळून आली नाही.


या प्रकरणी रोशन घेगडमल आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरुणीला नेमके कोणत्या कारणासाठी घेऊन जाण्यात आले, याबाबत तपास सुरू असून पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात येत आहे.
पहाटेच्या सुमारास घराबाहेरून तरुणीला घेऊन जाणे आणि विरोध करणाऱ्या भावाला चाकूचा धाक दाखवून मारहाण केल्याच्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button