Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरक्राईम

राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड

मा. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली, मा. राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशा नुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर तर्फे मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. शिवाजी भ. कचरे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा न्यायाधीश-१व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. राजेश एस. गुप्ता यांच्या उपस्थितीत शनिवार दि. १२/०९/२०२६ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन जिल्हा न्यायालय, अहमदनगर तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये करण्यात आले होते.
राष्ट्रीय लोकअदालतमध्ये अहमदनगर जिल्हयामध्ये सर्व न्यायालयांतील दिवाणी व फौजदारी प्रकरणे, धनादेश / चेक संदर्भातील प्रकरणे, बॅंकेची कर्ज वसूली प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, कामगार न्यायालयांतील प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, वीज महावितरणाची समझोता योग्य प्रकरणे तसेच न्यायालयात येण्या अगोदरची दाखलपूर्व प्रकरणे आपसी समझोत्या करीता ठेवण्यात आली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


अहमदनगर जिल्हयामध्ये ४७,१७९ दाखलपूर्व प्रकरणे मिटविण्यात आली. तर २,२४० प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला, विशेष मोहिमेमध्ये १,३४७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. सदर लोकअदालतीध्ये साधरणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड झाली आहे. सदरचे लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, जिल्ह्यातील सर्व वकील संघटना, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, जिल्हा पोलीस कार्यालय यांचे महत्वाचे सहकार्य लाभले. तसेच जिल्ह्यातील सर्व न्यायालयीन कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी यांचे योगदान लाभले अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव, श्री. योगेश सु. पैठणकर यांनी दिली.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button