Letest News
पर्युषण महापर्वानिमित्त जिल्ह्यातील कत्तलखाने मांस विक्री केंद्रे बंद जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया य... चाकूचा धाक दाखवून तरुणीला घेऊन पसार! भावाला लाथाबुक्क्यांनी मारहाण रोशन घेगडमलसह दोघांविरुद्ध तक्रार प्रवीणभाऊ आल्हाट यांची मानवाधिकार असोसिएशनच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती थरावर थर… कौशल्याचा कहर! शिर्डीत सनमित्र-क्रांतीच्या दहीहंडीचा पुन्हा एकदा जल्लोष अहिल्यानगरचा डाग पुसण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची धडपड शिर्डीतील काही पोलिसांमुळे प्रयत्नांना तिलांजल... ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती
अ.नगरक्राईम

पर्युषण महापर्वानिमित्त जिल्ह्यातील कत्तलखाने मांस विक्री केंद्रे बंद जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे आदेश

नगर : जैन धर्मियांच्या पर्युषण महापर्वानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने तसेच मांस विक्री केंद्रे ८ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत.
पर्युषण महापर्वाच्या कालावधीत जिल्ह्यातील कत्तलखाने व मांस विक्री केंद्रे बंद ठेवावीत, अशी मागणी एचएडब्ल्यूआर सदस्य, ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया तथा मिशन सेफ विहार ग्रुपचे अध्यक्ष यश शहा यांनी जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली होती.
या निवेदनासोबत महाराष्ट्र शासनाचा संबंधित आदेश तसेच ॲनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडिया यांचे याबाबतचे परिपत्रकही जोडण्यात आले होते. प्राप्त निवेदन व संबंधित शासन निर्देशांचा विचार करून जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्री केंद्रे सदर कालावधीत बंद आदेशाची काटेकोर अंमलबजावणी

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ८ सप्टेंबर ते १५ सप्टेंबरदरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्री केंद्रे पूर्णपणे बंद ठेवणे बंधनकारक राहणार आहे. या कालावधीत संबंधित आस्थापनांमधून कत्तल करणे, मांस विक्री करणे अथवा मांस विक्रीसाठी केंद्र सुरू ठेवणे करता येणार नाही. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व प्रशासनाने आदेशाची अंमलबजावणी सुनिश्चित करून नियमांचे उल्लंघन होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
पर्युषण महापर्वाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे जैन समाजातून स्वागत होत असून, आदेशाची संबंधितांनी काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button