Letest News
शिर्डीत मटक्याचा सुळसुळाट! टपरीच्या आडोशाला ‘कल्याण’चा डाव पोलिसांचा छापा एक जेरबंद विठ्ठल पवारवर ३३ लाखांच्या आर्थिक अफरातफरीचा गुन्हा दाखल! बनावट सह्या करून संस्थेला लाखोंचा गंडा भाविक सेवेत SBIची ‘साईसेवा’ ६९ लाखांचे अत्याधुनिक डिश वॉशिंग मशीन देत जपली सामाजिक बांधिलकी! समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ...
क्राईमशिर्डी

साई संस्थान मधील माजी सैनिकांची पडताळणी त्यात अनेक माजी सैनिक बोगस निष्पन्न

शिर्डी : साई संस्थानच्या सुरक्षा विभागात  काही सुरक्षा रक्षक  माजी सैनिकांच्या सेवेचा लाभ घेत असल्याच्या संशयावरून संस्थान ने त्यांच्या कागद पत्र पडताळणी चे आदेश दिले होते त्याची काल प्रत्यक्ष पडताळणी पार पडली.






















या पडताळणी साठी जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीचे ले . कर्नल कोरडे यांचे शिष्टमंडळ शिर्डीत दाखल होत त्यांचे समोर सदर पडताळणी पार पडली.
































बनावट माजी सैनिकांचे धाबे दणाणले होते. संस्थान ने याची नोंद घेत दि २ जून रोजी पत्र काढत सेवेत असणाऱ्या माजी सैनिकांना कागदपत्रे जमा करण्याचे आदेश दिले होते. त्यावर संरक्षण विभागाने अंमलबजावणी करत मे .मॉडर्न वीर रेस सिक्युरिटी फोर्स पुणे,मे. रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस या दोन्ही एजन्सी कडून कागदपत्रे मागवली होती.













































आता संस्थान ने नव्याने दि २३ जून रोजी पत्र काढत सर्व माजी सैनिक यांचे कागद पत्राची पडताळणी करणे कामी मुळ कागदपत्रे उपलब्ध करून काल बुधवार दि. २५जून रोजी सकाळी ११ वाजता कामगार विभाग कार्यालयात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातून दिलेले माजी सैनिक ओळखपत्र, डिस्चार्ज बुक,







































पेंशन ऑर्डर, स्मार्ट हेल्थ कार्ड याच्या मूळ प्रतिसह प्रत्यक्ष हजर रहाण्यास सांगितले होते . त्यानुसार जिल्हा माजी सैनिक कल्याण समितीचे ले कर्नल कोरडे व त्यांचे शिष्ट मंडळ, प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले, कामगार अधिकारी शरद डोखे





















































याच्या उपस्थितीत सर्व माजी सैनिकांना समक्ष बोलावून कागदपत्रांची तपासणी केली . असता अनेक जणांकडे अपुर्ण अथवा बनावट कागदपत्रे आढळली तर एका जणा कडे कागदपत्रेच नव्हती असा धक्कादायक प्रकार समोर आला . सदर पडताळणी प्रक्रीयेची समरी प्रशासकीय अधिकारी भोसले यांना सोपवण्यात आली आहे .


































दरम्यान या पडताळणीत संस्थान किती जणांना घरचा रस्ता दाखवते तसेच बोगस पगार लाटणाऱ्याना संस्थान काय कारवाई करते तसेच ज्या सुरक्षा एजन्सी नी या बनावट धारकांना कामावर घेतले त्यांचे वर काय कारवाई होते ? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे .

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button