Letest News
अरेरे ह्या गद्दार भावड्याचं करायचं काय खाली खाली डोकं वर पाय शिवसैनिक संतप्त  भाविकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर- शिर्डीत 20 जूनला आंदोलन ‘एक पीडित बहीण-सोबतीला लाखो हिंदू’- शिर... साई संस्थानमध्ये ‘शिस्तीचा बुलडोझर’ CEO गोरक्ष गाडीलकर ॲक्शन मोडमध्ये नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थ... मोहरम सण शांतता-सौहार्द आणि सामाजिक सलोखा जपत साजरा करा - जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया ऑपरेशन टायगर नव्हे टायगरला आधी दात हवेत!"शिर्डीत खासदार अरविंद सावंत यांची सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीक... "मी तिला मारलंय…" मित्राला केलेला फोन ठरला घातक खुनाचा पर्दाफाश-श्रीगोंदा हादरला! तरुणीचा खून करून प... श्रीरामपुरात कट्टा-काडतुसांसह दोन जण जेरबंद पोलिसांच्या संयुक्त कारवाईने मोठा अनर्थ टळला "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव- पोलिस दलात संताप "चोरी तो चोरी-ऊपर से सीना जोरी!" – बदलीविरोधात कबाडींची मॅटमध्ये धाव-पोलिस दलात संताप साईनगरीत मानवतेचा संदेश-विखे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईनाथ रुग्णालयात फळवाटप
शिर्डी

श्री साईबाबा मंदिराचे चारही गेट खुले करणे,चारही गेट जवळ मोबाईल आणि चप्पल स्टँड असावे व चारही गेट जवळ सशुल्क दर्शन पास व्यवस्था असावी 

श्री साईबाबा मंदिराचे चारही गेट खुले करणे,चारही गेट जवळ मोबाईल आणि चप्पल स्टँड असावे व चारही गेट जवळ सशुल्क दर्शन पास व्यवस्था असावी
श्री साईबाबा मंदिराचे चारही गेट कोरोना महामारी मध्ये बंद करण्यात आले होते. त्यानंतर शिर्डी ग्रामस्थांनी वेळोवेळी उठाव केल्यानंतर गेट नंबर तीन हे अंशतः खुले करण्यात आले. या गेटमधून फक्त काही ठराविक ग्रामस्थांना आंत प्रवेश दिला जातो, मात्र सर्वसामान्य साईभक्तांना या प्रवेशद्वारातून आंत मध्ये जाण्यास मनाई आहे. तसेच दिव्यांग वयोवृद्ध साई भक्तांना शेजारील अडचणीच्या गेटने आत सोडले जाते. व्हीआयपी साई भक्तांना गेट नंबर दोन मधून आत बाहेर जाऊ दिले जाते. तर गेट नंबर चार मधून संस्थान कर्मचारी व अधिकाऱ्यांना आत व बाहेर जाण्यास मुभा आहे. तसेच गेट नंबर एक कायमस्वरूपी बंद करून गेट नंबर पाच ने भाविकांना बाहेर सोडले जाते. साईभक्तांना व ग्रामस्थांना मंदिर परिसरातील शनिदेव, महादेव, गणेश मंदिर, दत्त मंदिर, नंदादीप, ध्यानमंदिर व गुरुस्थान आदी ठिकाणी दर्शनाला जाणे साठी संपूर्ण दर्शन रांगेतून समाधी मंदिर द्वारे वरील ठिकाणी जावा लागते. त्यामुळे एवढ्या मोठ्या दर्शन रांगेतून एकदा गेलेला भक्त पुन्हा आत जाण्यास धजावत नाही. शिर्डीत दोन दिवस मुक्काम करून पूर्वीप्रमाणे मंदिर परिसरात शांतपणे बसावे, बाबांचे नामस्मरण करावे, अशी अनेक भाविकांची मनस्वी इच्छा असते. परंतु चुकीच्या नियोजनामुळे भक्तांना एकाच दिवसात शिर्डीतून बाहेर जावे लागते.या प्रश्नी भाविकांची मोठी नाराजी दिसून येते त्याचा परिणाम शिर्डीतील व्यावसायिकांच्या अर्थकारणावर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. या सर्व गोष्टी ग्रामस्थांनी वेळोवेळी साईबाबा संस्थान प्रशासनातील अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिल्या आहेत. परंतु अधिकारी याबाबत योग्य तो निर्णय घेण्या ऐवजी याकडे दुर्लक्ष करतांना दिसतात. तसेच साई उद्यान इमारतीत लाडू काउंटर व सशुल्क दर्शन पास व्यवस्था सुरू करावी, गर्दी कमी असतांना भक्तांना पूर्वीचे १६ गुंठे शेजारील गेटने दर्शनास सोडावे, जेणेकरून भक्तांना साई समाधीचे वेळेतच दर्शन होईल. तसेच चारही गेट मधून भाविकांना दर्शनासाठी
आत बाहेर जाण्यास खुले करावे, या संदर्भात निवेदन देण्यासाठी शांततेच्या मार्गाने भव्य मोर्च्याद्वारे शुक्रवार दिनांक २६ जुलै रोजी सकाळी ठीक १० वाजता मारुती मंदिराजवळ उपस्थित रहावे ही विनंती..
समस्त शिर्डी व्यापारी संघटना व शिर्डी ग्रामस्थ..
टीप..सदरचे आंदोलन(मोर्चा) बिगर राजकीय असून यामध्ये कोणीही राजकारण आणू नये असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे 

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button