Letest News
शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई!
अ.नगरराजकीय

आणीबाणीमध्ये कारावास भोगलेल्या संघर्षयात्रींचा उपजिल्हाधिकारी गिते यांच्या हस्ते गौरव

अहिल्यानगर, दि.२५- देशात आणीबाणी लागू झालेल्या घटनेस ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आणीबाणीत कारावास भोगलेल्या जिल्ह्यातील संघर्षयात्रींचा निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात एका विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र, गुलाबपुष्प देवून गौरव करण्यात आला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

 यावेळी तहसीलदार (सामान्य प्रशासन) शरद घोरपडे, तहसीलदार श्री.सबनीस, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी सुरेश पाटील, माहिती अधिकारी अमोल महाजन, विजय जोशी, विजय वहाडणे, राजाभाऊ मुळे आदी उपस्थित होते. 

यावेळी विजय जोशी, विजय वहाडणे व राजाभाऊ मुळे यांनी मनोगत व्यक्त केले. आणीबाणी विरोधात लढा देणाऱ्या संघर्षयात्रींचा शासनाने सन्मान करुन कृतज्ञता व्यक्त केल्याबाबत त्यांनी राज्य शासनाचे आभार व्यक्त केले.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते म्हणाले, देशात आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेस ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींचा व त्यांच्या वारसांचा सत्कार करण्यात येत असल्याचे सांगत  सन्मानपत्रामध्ये असलेल्या मजकुराचे त्यांनी यावेळी वाचनही केले. 

आजच्या या सत्कार सोहळ्यास अनेक वयोवृद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. जिल्हा प्रशासनाच्यावतीने त्या व्यक्तींचा जागेवर जाऊन त्यांचा सन्मान केला.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button