Letest News
शिर्डीत गुन्हेगारांचा उच्छाद-मध्यरात्री चाकूसह दहशत – पोलिसांची धडक कारवाई श्रीरामनवमी उत्सवानिमित्त पालखी सोहळ्यांचे जल्लोषात स्वागत-संस्थानची सेवाभावाची परंपरा कायम “भोंदू बाबाच्या कुकर्मांनी महाराष्ट्र हादरला-आता मोठ्या लोकांचे धागेदोरे बाहेर येणार?” – अमोल मिटकरी... किशोरी पेडणेकर यांचा शिर्डीत संतापाचा स्फोट! किशोरी पेडणेकर : “कॅप्टनच्या नावाखालील राक्षस उघड करा!” साईसेवेतील प्रामाणिकपणाचा उज्ज्वल आदर्श! पहारेकरी यांची कर्तव्यनिष्ठा ठरली प्रेरणादायी भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठा स्फोट! अटकेपूर्वी शिर्डीत गुप्त बैठक-तीन आयएएस अधिकाऱ्यांवर संशय रामनवमी २०२६ : साईभक्तांच्या पदयात्रेत कीर्तन-प्रवचनांची भक्तीमय मेजवानी #AshokKharat #ShirdiConnection #शिर्डीतून उघड झाला भोंदू साम्राज्याचा काळा खेळ अंधश्रद्धेच्या आडून ल... गुढीपाडवा विशेष : साईनगरीत भक्तीचा महापूर! शिर्डीत आज आणि उद्या दिवसभर धार्मिक कार्यक्रमांची मेजवानी शिर्डीत ‘कॅप्टन’ खरातचे जाळे! चाहत्यांपासून कोट्यवधींच्या साम्राज्यापर्यंत – अटकेनंतर खळबळ
Blogअ.नगरराजकीय

आता मलाच लाज वाटते ‘त्या’ महामार्गाच्या भूमिपूजनाला बोलवू नका’; गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील रस्ते विकास कामांचा आढावा घेतला. नगर-शिर्डी महामार्गाच्या कामातील दिरंगाईबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला. कोल्हार-नांदूर शिंगोटे महामार्गाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सुरत-चेन्नई महामार्गामुळे राज्याचा विकास होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. तसेच, महाराष्ट्र सरकारने रस्त्याच्या बाजूला औद्योगिक क्लस्टर उभारावेत, असे आवाहनही त्यांनी केले.हिल्यानगर जिल्ह्यात हजारो कोटींचे रस्ते विकासाची कामं सुरू आहे.अनेक प्रश्न सोडवले जातील. जिल्ह्यातील विविध महामार्गाच्या कामाला मंजूरी देण्यात आली आहे.

सर्वात अडचणीचा मुद्दा नगर ते शिर्डी महामार्ग आहे. मलाही कळत नाही कॉन्ट्रॅक्टर का टिकत नाही? आत्तापर्यंत तीन टेंडर रद्द झाले. त्या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करून त्यांची बँक गॅरंटी जप्त करा.

आता नव्याने नगर शिर्डी महामार्गाची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच याचे काम सुरू होईल. मात्र या भूमिपूजनाला मला बोलू नका कारण आता मलाच लाज वाटते, अशा शब्दात नितीन गडकरी यांनी नगर शिर्डी महामार्गाच्या कामाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

अहिल्यानगर ते शिर्डी रस्त्याचे डांबरीकरणाऐवजी कॉंक्रीटीकरण होवुन राहाता शिर्डी शहरातुन जाणा-या रस्त्यावर उड्डाणपुल कऱणेत यावा या मागणीचे निवेदन भाजपा नेते डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितीनजी गडकरी यांना शिर्डी विमानतळ येथे दिले.

दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,गेल्या 40 वर्षापासुन नगर शिर्डी या महामार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. त्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत असुन असंख्य बळी जात आहे. उत्तर दक्षिण भारतातुन शिर्डीत येणा-या भाविकांना व सामान्य जनतेला मनस्ताप सहन करावा लागत आहे.

जागोजागी रस्ते अर्धवट खोदुन ठेवल्याने मोठ्या प्रमाणावर अपघात होत असुन खोदलेले रस्ते तात्काळ बुजवले नाही तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होवुन निराप्राध लोकांचे बळी जाणार असल्याची शक्यता आहे. रस्ते खोदुन ठेवल्याने एकेरी वाहतूक सुरु आहे. रस्त्याच्या बाजुला बांघकाम साहित्य आहे

यामुळे 2-3 तास एकाच ठिकाणी वाहतूक ठप्प होवुन जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सामान्य जनतेच्या मनात संतापाची तीव्र भावना आहे. अर्धवट कामामुळे रस्त्याची अत्यंत भिषण अवस्था झालेली असुन वाहन चालवणे अवघड झाले आहे हा रस्ता नसुन जणु मृत्युचा सापळाच बनला आहे. या रस्त्यावर प्रवास करताना प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.



सर्वाधिक अवजड वाहनांची वर्दळ असणा-या या महामार्गावर लहान मोठी वाहने दुचाकी स्वारांना अक्षरश: जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. केवळ खड्ड्यांमळे फार लोकांचे प्राण या रस्त्यावर गेले आहेत. शिर्डी नगर जिल्ह्यातील सर्वाधिक वाहतुक असलेला शिर्डी-नगर हा एकमेव महामार्ग आहे.

रस्ताला जागोजागी ठिगळ देवुन डागडुजी केली आहे. वाहने आदळुन किंवा खड्डे चुकविताना अपघात प्रवाशांचे हाडे खिळखिळी होत आहेत. खराब रस्त्यांमुळे वाहने नादुरुस्त होवुन वाहतूकीचा खोळंबा होतो. शिर्डी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीर्थ क्षेत्र आहे. ज्या लोकांना शिर्डीमध्ये न थांबता पुढे जायचे आहे

त्याकरीता पिंपरीनिर्मळ पासुन शिर्डी राहाता शहरातुन निमगाव -निघोज पर्यंत उड्डाणपुल होणे गरजेचे आहे. त्यामुळे रस्ता ओलांडताना भक्तांना होणारा त्रास कमी होईल.तसेच शिर्डी राहाता शहरातील वाहतुकीची कोंडी कमी होईल तरी याबाबत आपण लक्ष घालावे अशी विनंती निवेदनाद्वारे केली.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button