Letest News
समकालीन साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे वाड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतले दर्शन साईसच्चरिताचा जयघोष सवाद्य मिरवणुकीने पारायण सोहळ्याला दिमाखात सुरुवात! मंगलमय वातावरणात श्रीसाईसच्चरित पारायण सोहळ्याचा शुभारंभ काळे रुमाल बांधलेल्या दोन चोरट्यांचा शिर्डीत धुमाकूळ लाखोच्या सोन्याची चैन हिसकावली गोरगरिबांच्या शिध्यावर डल्ला? राहात्यात ५.९० लाखांचा माल ताब्यात शिर्डीत भिक्षेकऱ्यांविरोधात पोलिसांची धडक मोहीम-भल्या पहाटे पोलिसांचा शहरभर धडाका नगर-मनमाड महामार्गाची साडेसाती संपणार कधी? सहा वर्षांत तीन कंत्राटदार बदलले तरी लोकप्रतिनिधींचे मौन ... तोतया पत्रकारांची धाड की खंडणीचा डाव? महिलेकडे मागितले तब्बल एक लाख! ग्रामपंचायत अधिकाऱ्याची १० हजारांची लाच मागणी ५ हजार घेताना ACBच्या जाळ्यात! साईबाबांच्या बदनामीकारक व्हिडीओंना चाप बसणार! दिल्ली उच्च न्यायालयाचे GAC ला दणका
राजकीयशिर्डी

काय वर्णवावे साईभक्तांची भक्ती! २३ लाखांचा सुवर्ण-हिरे जडीत हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण

शिर्डी : श्री साईबाबांवर देश-विदेशातील लाखो भाविकांची अढळ श्रद्धा असून भाविक भक्तिभावाने श्रींच्या चरणी विविध प्रकारे दान अर्पण करीत असतात. साईबाबांप्रती असलेल्या याच श्रद्धा आणि भक्तीपोटी तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील साईभक्त श्री. के. एस. एस. भगवान यांनी श्री साईबाबांच्या चरणी आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण-हिरे जडीत हार अर्पण केला.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


सदर हाराचे वजन १९३.७०० ग्रॅम असून त्यावर आकर्षक नक्षीकाम करण्यात आलेले आहे. या मौल्यवान हाराची अंदाजे किंमत २३ लाख ५९ हजार ६५३ रुपये इतकी आहे. साईभक्ताने अत्यंत भक्तिभावाने हा सुवर्ण-हिरे जडीत हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केला.


या प्रसंगी जिल्हा व प्रधान न्यायाधीश तथा श्री साईबाबा संस्थानच्या तदर्थ समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजीराव कचरे यांच्या हस्ते दानशूर साईभक्त श्री. के. एस. एस. भगवान यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) उपस्थित होते. साईभक्तांच्या या उदार दानामुळे संस्थानकडून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button