Letest News
राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई! साईचरणी दिल्लीच्या साईभक्ताचा चांदीचा मुकुट अर्पण ७७७ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम वजनाचा आकर्षक चांदीचा मुकु...
क्राईमशिर्डी

चोरांनी घरांचे कुलूप तोडून मुद्देमाल पळवला वरून मारहाण केली शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल 

शिर्डी( प्रतिनिधी) घरात कोणी नसल्याचे पाहून घराच्या दरवाजाचे कुलूप -कोंडा तोडून घरातील वीस हजार रुपये रोख व एक लाख वीस हजार चे सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरांनी चोरी केला असल्याची फिर्याद साईबाबा सुपर हॉस्पिटल मधील आरोग्य सेवक म्हणून काम करणारे राहुल प्रकाश ओहोळ रा. निमगाव तालुका राहाता यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की,मी व घरात माझी पत्नी प्राजक्ता असे आम्ही एकत्र राहण्यास असुन मी व माझी पत्नी स्टाफ नर्स म्हणुन श्री साईबाबा हॉस्पीटल येथे नोकरीस आहे. मी दि. 20/02/2025 रोजी उज्जैन येथे माझे मित्रांसोबत देवदर्शनाकरीता गेलेलो होतो.


दि.22/02/2025 रोजी रात्री 08/00 ते दि.23/02/2025 रोजी सकाळी 08/00 पावेतो माझी पत्नी प्राजक्ता हिला रात्रीची ड्युटी असल्याने ती रात्री 07/50 वा.चे सुमारास श्री साईबाबा हॉस्पीटल येथे ड्युटीकरीता जाण्यासाठी घर बंद करुन घराला बाहेरुन कुलुप लावुन ड्युटीकरीता गेलेली होती.


त्यानंतर दि. 23/02/2025 रोजी पहाटे 05/00 वाजण्याचे सुमारास मी उजैन येथुन देवदर्शन करुन पुन्हा घरी आलो असता मला आमचे घराचा दरवाजा हा उघडा दिसला व दरवाजाचे कुलुप व कोंडा तुटलेले दिसले. तेव्हा मी घरात जावुन बघीतले असता मला घरातील कपाटाचा दरवाजा उघडा दिसला व कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले असून उजकापाचक झालेली दिसली. मी कपाटात ठेवलेले 20,000/- रुपये व दागिने तेथे दिसुन आले नाही.

तेव्हा मी माझी पत्नी प्राजक्ता हिस फोन करुन झाले घटनेबाबत माहीती दिली व तिला ताबडतोब घरी बोलविले तेव्हा आमची खात्री झाली की दि.22/02/2025 रोजी रात्री 08/00 ते दि. 23/02/2025 रोजी पहाटे 05/00 वाजण्याचे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने आमच्या घराचे दरवाजाचे लॉक तोडुन, आत प्रवेश करुन सामानाची उचकापाचक करुन कपाटात ठेवलेले रोख 20000 ची रक्कम चोरुन नेली आहे.

तसेच कपाटातील 25,000/- रु. किंमतीचे सोन्याचे कानातले टॉप , 25,000/- रु. किंमतीचे सोन्याचे कानातले वेल,व 50,000/- रु. किंमतीचे सोन्याचे मिनीगंठण,आणि 20,000/- रु. किंमतीचे सोन्याचे डोरले असा एकूण रोख वीस हजार व एक लाख वीस हजार चे सोन्याचे दागिने मिळून एक लाख 40 हजारा चा मुद्देमाल चोरून नेला आहे.

अशा आशयाची फिर्याद शिर्डी पोलीस स्टेशनला त्यांनी दाखल केली असून या फिर्यादीनुसार शिर्डी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 194/2025 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 305(a)व 331 ( 4) त्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास शिर्डीचे पोलीस करत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button