Letest News
शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड हद्दपार आरोपी रुईत आल्याची माहिती मिळताच पोलिसांची धडक कारवाई!
अ.नगरक्राईम

मारहाण करणाऱ्यांनो सावधान न्यायालयाने आरोपीस एक वर्षाची सुनावली शिक्षा आणि दंडही केले 

कोपरगाव प्रतिनिधी 

sai nirman
जाहिरात

दि. 20/09/2020 रोजी रात्री 08/15 वाचे दरम्यान फिर्यादी  घरी असतांना  फिर्यादीचा भाऊ सोमनाथ व भाऊजई मंगल यांचेत घरगुती कारणावरुन मोठ मोठ्यांनी वाद चालु होते त्यावेळी आरोपी  अमोल म्हसु शिरसाठ हा सदर ठिकाणी आला व  फिर्यादीची भाऊजई मंगल व भाऊ सोमनाथ यांना शिवीगाळ करु लागला व त्यांना म्हणाला तुम्ही मला शिवीगाळ का करता त्यावेळी फिर्यादीने  आरोपी अमोल यास  त्यांचे  आपसात वाद चालु आहेत

DN SPORTS

kamlakar

तु मध्ये पडु नकोस मात्र असे म्हणाल्याचा त्यास राग येवुन त्याने  फियादीच्या -भाऊजईला शिवीगाळ करुन  त्याचे घरी जावुन लाकडी काठी आणुन फिर्यादीची भावजई मंगल हिस मारहाण करु लागला त्यावेळी फिर्यादी सदरचे भांडण सोडविण्याकरिता मध्ये पडला असता आरोपीने त्याचे हातातील काठीने  फिर्यादीच्या डोक्यात मारुन  फिर्यादीस जखमी केले

तसेच    फिर्यादीची आई हिराबाई ही मध्ये आली असता तिलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन दम दिला की परत तुम्ही माझे नादी लागला तर तुम्हाला मी संपवुन टाकील अशी धमकी दिली. होती त्यामुळे फिर्यादीने आरोपी विरुद्द कोपरगाव तालुका पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता 

 सदर केसची सुनावणी अति. मुख्य न्यायदंडाधिकारी भगवान पंडीत साहेब यांचे  समोर होऊन आरोपी विरुद्ध सरकार पक्षाचा पुरावा ग्राहय धरून सदर प्रकरणात आरोपीस, भा.द.वी कलम ३२४, व ३२३ प्रमाणे  दोषी धरून मे . न्यायालयाने आरोपीस  एक वर्षाची प्रोबेशन कालावधीची शिक्षा देण्यात आली आहे तसेच व रक्कम  रू-३००० दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. सरकार पक्षाकडून, सरकारी वकील प्रदीपकुमार रणधीर यांनी कामकाज पाहीले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button