Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगरराजकीय

अहिल्यानगरमध्येही ठाकरे गटाला खिंडार

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात अनेक ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागली आहे. त्यामध्ये अहिल्यानगरचाही समावेश आहे. येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला आहे. उऱलेल्यांपैकी बहुतांश पदाधिकारी आता प्रवेश करणार आहेत.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी यासंदर्भात नगरमधील शिंदे सेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी चर्चा केली. त्यामध्ये ३० तारखेला प्रवेश करण्याचे ठरले. ठाकरे सेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह माजी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, संजय शेंडगे, श्याम नळकांडे, सचिन शिंदे, संतोष गेनाप्पा, परेश लोखंडे, संग्राम कोतकर, बबलू शिंदे यांचा शिंदे सेनेत प्रवेश होणार असल्याचे समजल्यावर दानवे यांनी सोमवारी नगरला आले.

त्यांनी या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची हक्काची जागा राष्ट्रवादीला सोडल्याचा राग कार्यकर्त्यांना आहे, त्यामुळे पक्ष सोडण्यावर ते ठाम राहिले. नगर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, नगर तालुका पंचायत समितीचे माजी सभापती रामदास भोर हेही शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.अर्थातच यामागे येणाऱ्या स्थानिक स्वराज्या संस्थांच्या निवडणुकीचे गणित आहे.

विधानसभा निवडणुकीच्यावेळी ही जागा पूर्वीप्रमाणे शिवसेनेकडे घ्यावी, अशी पदाधिकाऱ्यांची मागणी होती. त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. मात्र, वरिष्ठांनी ऐकले नाही. त्याचा रागही या पदाधिकाऱ्यांच्या डोक्यात आहे. तेव्हा तुम्ही आमचे ऐकले नाही, आता तुमचे का ऐकावे, असे हे पदाधिकारी मध्यस्थी करण्यासाठी येणाऱ्यांना सांगत आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button