Letest News
दहीहंडी फोडून श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता! रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याला काळिमा नीच चैतन्य पाटीलच्या कृत्याचा काळा महिमा!! इन्स्टाग्रामवरील मैत्री ठरली मानसिक छळाचा ससेमिरा; दोघांवर गंभीर गुन्हा! शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक
राजकीयशिर्डी

साईबाबाचा आशिर्वाद असल्याने माझा विजय काळ्या दगडावरची रेघ.डॉ. राजेंद्र पिपाडा

साईबाबाचा आशिर्वाद असल्याने माझा विजय काळ्या दगडावरची रेघ.डॉ. राजेंद्र पिपाडा

राहता प्रतिनिधी/ शिर्डी विधानसभा मतदारसंघात आपला विजय निश्चित आहे. असा ठाम विश्वास अपक्ष उमेदवार डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी निवडणूक मतदान प्रक्रिया संपल्यानंतर व्यक्त केला. विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉ राजेंद्र मदनलाल पिपाडा व लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ ममता पिपाडा, श्रृती पिपाडा, टविंकल पिपाडा, परीवारावाने एकत्रित जाउन मतदार केंद्रात आपला मतदानाचा हक्क बजावला लोकशाहीत जय पराजय ठरलेला असतो.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मात्र आपण कुठल्याही दडपशाहीला न जुमानता सर्व सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे यासाठी जो संघर्ष आज पर्यंत करत आलेलो आहे. त्याची पावती राहाता तालुक्यातील मतदार विजयी करून देतील. असा विश्वास राजेंद्र पिपाडा यांनी व्यक्त केला.
डॉक्टर राजेंद्र पिपाडा म्हणाले की, निवडणुकीत मतदाराचा आग्रह होता की, तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे त्यासाठी आपण पक्षाकडे देखील मोठा पाठपुरावा केला

,न्याय मिळेल अशी अपेक्षा होती परंतु अल्पसंख्याक समाजातील मी असल्याने मला तिकीट मिळाले नाही. पण मी खचलो नाही, जनमताचे पाठबळ ,गोरगरीब जनतेचा व साईबाबाचा आशिर्वाद व साईबाबा संस्थान कर्मचारी शेतकरी व्यावसायिक व्यापारी सहकारात माफक पगारावर काम करणारे हजारो कर्मचारी माझ्या पाठीशी होते. काहीजण बरोबर होते तर काहींनी अप्रत्यक्ष नको त्रास म्हणून पडद्यावर न येता मोठी साथ दिली आहे.

साईबाबाचा आशिर्वाद आपल्या पाठीशी आहे. विरोधकाच्या बरोबर साईचा आशिर्वाद नाही. अशी माझी धारणा आहे .तसे असते तर नगर मध्ये पराभव झालाच नसता यावर माझा मोठा विश्वास आहे. सलग ३५ वर्ष जे आमदार व मंत्री म्हणून लोकप्रतिनिधी या मतदार संघाचे राहीले त्यांना याच मतदार संघात आपल्या विजयासाठी गुंतुन पडावे लागले . त्याबरोबर झालेली दमछाक यातच सर्व काही आले आहे .

फारसा राजाश्रय व आर्थिक परिस्थिती नसताना आपण जनहिताच्या दृष्टीने उमेदवारी केली.त्यामुळे २३तारखेला जो निकाल येणार आहे तो धक्कादायक राहणार असून मी विजयी होणार ,असा विश्वास असल्याचे डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांनी दैनिक साई दर्शनशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.व सर्व मतदारांचे आभार मानले आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button