Letest News
साईदरबारात सोन्यापेक्षा प्रामाणिकपणाला किंमत!४५ हजारांची सोन्याची अंगठी सापडली कर्मचाऱ्याने क्षणाचाह... शिर्डी पोलिसांचा दणका! अट्टल मोटारसायकल चोरट्याच्या मुसक्या आवळल्या श्रेय घ्यायचं असेल तर मृत्यूची जबाबदारीही घ्या!’ पिपाडांचा विखेंवर घणाघाती हल्लाबोल वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’चा सवाल एलसीबीचा हातोडा! ३०.४० लाखांचा मुद्देमाल जप्त शिर्डीतील आरोपीसह तिघे... शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना
अ.नगरक्राईम

अहिल्यानगर पोलिस दलात खळबळ! अमली पदार्थ विक्रीकांडात LCBचे माजी प्रमुख कबाडींना मॅटचा दणका

राहाता विशेष प्रतिनिधी : अहिल्यानगर जिल्हा पोलीस दलाला हादरवून सोडणाऱ्या जप्त अमली पदार्थ विक्री प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) माजी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी शिर्डी मंदिर सुरक्षा विभागात करण्यात आलेल्या बदलीविरोधात महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) धाव घेतली होती. मात्र, त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला असून मॅटने बदलीविरोधातील याचिका फेटाळून लावत कबाडी यांना जोरदार दणका दिला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

नेमकं प्रकरण काय?

स्थानिक गुन्हे शाखेच्या अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या मुद्देमाल कक्षातून जप्त करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपये किमतीच्या अमली पदार्थांची परस्पर विक्री झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला होता. जप्त मुद्देमालाच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या प्रकरणाने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती.

या संपूर्ण काळात स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्याकडे होती. या प्रकरणात एका पोलीस कर्मचाऱ्यावर गंभीर कारवाई करत त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचेही समोर आले होते.

अधीक्षकांची प्रशासकीय कारवाई; कबाडींची LCB मधून बदली

या गंभीर प्रकाराची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी प्रशासकीय पातळीवर कारवाई करत किरणकुमार कबाडी यांची स्थानिक गुन्हे शाखेतून बदली करून त्यांना शिर्डी मंदिर सुरक्षा विभागात नियुक्त केले.

मात्र ही बदली कबाडी यांनी स्वीकारली नाही. बदली अन्यायकारक असून ती सूडबुद्धीने करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी थेट महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे दरवाजे ठोठावले.

पण मॅटमध्ये डाव फसला!

बदली रद्द करण्यासाठी करण्यात आलेली याचिका मॅटसमोर टिकू शकली नाही. प्रकरणातील परिस्थिती, प्रशासकीय अधिकार आणि जबाबदारीच्या मुद्द्यांचा विचार केल्यानंतर मॅटने कबाडी यांची याचिका फेटाळून लावली.

या निर्णयामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या प्रशासकीय कारवाईला मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

“मुद्देमाल गायब होतो आणि बदलीला विरोध?” नागरिकांचा सवाल

जप्त केलेल्या अमली पदार्थांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करणारे गंभीर प्रकरण समोर येते, पोलीस दलाची प्रतिमा मलिन होते आणि त्यानंतर संबंधित काळातील प्रशासकीय जबाबदारीवर प्रश्न उपस्थित झाल्यावर बदलीला विरोध केला जातो, असा संतप्त सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मॅटच्या निर्णयानंतर आता किरणकुमार कबाडी यांना शिर्डी मंदिर सुरक्षा विभागातील नियुक्ती स्वीकारावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या निर्णयामुळे अहिल्यानगर पोलीस दलात मोठी चर्चा सुरू असून, प्रशासकीय शिस्त आणि जबाबदारीच्या बाबतीत कोणालाही सूट नाही, असा स्पष्ट संदेश या निर्णयातून गेल्याची चर्चा आहे.

“LCBच्या मुद्देमाल कक्षातून कोट्यवधींचे अमली पदार्थ गायब… आणि त्यानंतर बदलीला आव्हान; अखेर मॅटने फेटाळली याचिका!”

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button