Letest News
कोपरगावात स्थानिक गुन्हे शाखेचे धडक सत्रपाच ठिकाणी छापे ११ आरोपींवर ५ गुन्हे २.१४ लाखांचा मुद्देमाल ... विजयराव कोते पाटील यांचा सेवासंकल्प साईबाबांच्या पालखीसह अखेरची ऐतिहासिक तीर्थयात्रा सेवेतून साईभक्तीचा साक्षात्कार तीन दिवस १० हजार भाविकांना महाप्रसादअन्नदान हीच खरी साईसेवा-अय्यर परि... समता पतसंस्था प्रकरण : व्यवस्थापक मिलिंद बनकर व अध्यक्ष काका कोयटे यांना अटक करण्याची मागणी शिर्डीत दिव्यांग स्वाभिमानाचा ऐतिहासिक विजय! आ. बच्चू कडूंचे दिव्यांगांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी मो... गुरुपौर्णिमा उत्सवात साईभक्तांची श्रद्धेची उधळण!श्री साईबाबा संस्थानला अवघ्या तीन दिवसांत ७.८१ कोटीं... शिर्डीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त अनोखा उपक्रम: साई आश्रया अनाथालयातील मुलांना शैक्षणिक सा... गुरुपौर्णिमेत 'गावकरी गेट'वर संशयास्पद प्रवेशाचा खेळ? साईभक्त रांगेत… मग काहींना थेट प्रवेश कसा? धाडीनंतरही कायम अनुत्तरित प्रश्न साकुरी क्लबप्रकरणी 'मास्टरमाइंड' कोणाला वाचवले जात आहे? बोगस खात्यांच्या घोटाळ्यात मोठी कारवाई- आरोपी अशोक खरात शिर्डी पोलिसांच्या ताब्यात!
क्राईमशिर्डी

साईबाबा मंदिर परिसरातच चोरीचा धुमाकूळलेंडीबागेतील फायर यंत्रणेचे होज व ब्रांज लंपास शिर्डीतील सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह

शिर्डी : साईबाबा मंदिर परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आता थेट अग्निसुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या फायर यंत्रणेवरच चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. श्री साईबाबा मंदिर परिसरातील लेंडीबाग येथे आग व जीवसंरक्षणासाठी बसविण्यात आलेले फायर यंत्रणेचे होज व ब्रांज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे.याप्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरी गेलेल्या मालाची किंमत १२ हजार १०२ रुपये असल्याचे समोर आले आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


फिर्यादी संतोष मच्छिंद्र लांडगे (रा. चारी लांडगे वस्ती, राहाता) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दिनांक १३ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. लेंडीबाग परिसरात आग प्रतिबंधक व जीवसंरक्षणासाठी बसविण्यात आलेले फायर होज व ब्रांज कोणीतरी अज्ञात चोरट्याने आर्थिक फायद्याच्या उद्देशाने, कोणतीही परवानगी न घेता लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.


विशेष म्हणजे, लाखो साईभक्त रोज दर्शनासाठी येत असलेल्या अतिसंवेदनशील परिसरातच अग्निसुरक्षा यंत्रणा सुरक्षित नसल्याने प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. मंदिर परिसरातील सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? असा सवाल आता साईभक्त आणि नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास शिर्डी पोलीस करीत असून प्रभारी अधिकारी पोनि गालांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना गोसावी तपास करीत आहेत.

“चोरट्यांची संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थेला सलामी !”
शिर्डीसारख्या अतिसंवेदनशील आणि देशभरातील लाखो साईभक्तांच्या श्रद्धास्थान असलेल्या परिसरातच चोरट्यांनी थेट अग्निसुरक्षा यंत्रणेवर हात साफ केल्याने संस्थानच्या सुरक्षा व्यवस्थे वर शन्का निर्माण झाली असल्याचे समोर आले आहे. लेंडीबागेसारख्या महत्त्वाच्या परिसरातून फायर होज व ब्रांज चोरीला जाणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात असून, “चोरट्यांनीच आता सुरक्षा व्यवस्थेला सलामी ठोकली का?” असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button