Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
अ.नगरराजकीय

पारधी समाजासाठी दिवाळी विशेष उपक्रम पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचा आगळा वेगळा दिवस

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी यंदाची दिवाळी पारधी समाजासाठी एक आगळी वेगळी पद्धतिने साजरी केली. सोमवारी ते कामरगाव जवळील पारधी समाजाच्या पालावर जाऊन मिठाई आणि साडी चोळीचे वाटप केले.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

यावेळी पोलीस उपाधीक्षक गिरीश वमने, अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, तसेच सामाजिक कार्यकर्ते नामदेव भोसले उपस्थित होते. या उपक्रमामागील पुढाकार पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांचाच होता.

सदर उपक्रमाचा उद्देश पारधी समाजातील मुलांना चांगले शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करणे आणि महिला व पुरुषांना रोजगाराची संधी उपलब्ध करून समाजाची प्रगती साधणे हा होता.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे म्हणाले,
“आदिवासी समाज मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर या समाजाला प्रतिष्ठा मिळवणे आवश्यक आहे. मात्र अनेक ठिकाणी या समाजातील लोकांवर चुकीचे आरोप होत आहेत तसेच घरकुलांसाठी जागा मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या प्रत्येक योजनेची माहिती आणि लाभ पोहोचवण्यात येणार आहेत.”

शासनाच्या दृष्टीने पारधी वस्त्यांवर CCTV कॅमेरे बसवण्याचे उपक्रम सुरू आहेत. कामरगाव येथील वस्तीत एका वर्षापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, आणि याबाबत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

या दिवाळीच्या उपक्रमामुळे पारधी समाजाच्या जीवनात समानता, सुरक्षा आणि सामाजिक प्रगतीची भावना वाढेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.

🌟 समाजातील प्रत्येक घटकाला संधी देत उज्ज्वल भविष्य घडवण्याची जबाबदारी प्रत्येकाच्या पायावर आहे, असे पोलीस अधीक्षक घार्गे यांनी प्रतिपादन केले.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button