Letest News
चिक्की-बिस्किटांच्या नावाखाली गुटखा विक्रीचा आरोप पोलिसांनी तातडीने कारवाई करावी शिर्डीतील गुटखा तस्करीचा सूत्रधार कोण? १२ आरोपींनंतर आता ‘आका’पर्यंत पोलिसांचा तपास पोहोचणार का? गुटख्याच्या काळ्या बाजाराला एलसीबीचा दणका! तिघांना न्यायालयात हजर करताच एक दिवसाची पोलीस कोठडी पुरवठ... डॉ. सुजय विखेंचा मेंदू खराब झाला’- रोहित पवारांचा बोचरा पलटवार उदयपूर ते शिर्डी सातवी पदयात्रा भक्तिभावात पूर्ण- साईभक्त मोहित आचार्य यांचे शिर्डीत आगमन गुटखा तस्करांवर एलसीबीची वक्रदृष्टी शिर्डीत एकाच रात्री तीन गुन्हे दाखल! दैनिक साईदर्शनच्या पाठपुराव... साई निर्माण ग्रुपच्या संकल्पपूर्ती तीर्थयात्रेचा भक्तिमय सोहळा- साई निर्माण ग्रुप व विजयराव कोते यां... पोटची मुलगी गमावली-अनाथ मुलीला घेतले दत्तक… अर्धी संपत्ती तिच्या नावे! अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वा... सुमन काळे कोठडी मृत्यूप्रकरणाची फाईल पुन्हा उघडणार!१९ वर्षांच्या न्यायसंघर्षाला नवी दिशा तलाठी भरतीतील भ्रष्टाचारावर रोहित पवारांचा विखेंवर थेट हल्लाबोल ‘राजीनामा आधी द्या-मग पवारांवर बोला!...
क्राईमशिर्डी

साईसंस्थानच्या सुरक्षा रक्षकांच्या नाकावर टिच्चून चोरांनी दिली बगीच्यात हिरवीगार सलामी..!

shirdi news

शिर्डी (प्रतिनिधी) शिर्डी येथे साईबाबा संस्थानच्या 200 रूम गार्डन मधून रात्रीच्या वेळी चक्क चंदनाचे झाड कापून गाभा चोरून नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याआधीही साईबाबा संस्थानच्या विविध विभागांमध्ये चोरीचे प्रकार घडल्याच्या घटना घडल्या आहेत. मग त्यात विद्युत विभागाच्या भांडार गृहातून विद्युत वस्तूंची चोरी असो वा देणगी काऊंटर वरील पावत्यांची अफरातफर करून पैशांची झालेली चोरी असो तसेच काही दिवसांपूर्वी साई नगर येथील इमारती मागील टेलिफोन च्या वायर चोरून नेण्याचा एक नव्हे दोनदा प्रकार घडल्याने साईबाबा संस्थानच्या वस्तू सुरक्षित कधी होणार हा प्रश्न आता नागरिकांमधून विचारला जात आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS


सदर चोरीची घटना ही गेल्या रविवारची असून रात्रीच्या वेळी 200 रूमचे गार्डन बंद असते. मात्र त्या परिसराची सुरक्षा व्यवस्था पाहण्यासाठी सुरक्षा रक्षक तैनात असतात. परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. असे असताना सुरक्षा रक्षकांचा डोळा चुकवत चोरट्यांनी चंदनाचे झाड सुरक्षा रक्षकांच्या नाकावर टिच्चून अंधाराचा फायदा घेत कापून नेल्याने याबाबत मोठी चर्चा शिर्डीत होत आहे.याबाबत साईबाबा संस्थानच्या वतीने शिर्डी पोलिस स्टेशनला अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून 10 हजार रुपये किमंतीचे चंदन झाड चोरी प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 1048/2023 भारतीय दंड संहिता 1860 नुसार 379 कलमान्वये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पुढील तपास शिर्डी पोलिस करीत आहेत.


kamlakar

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button