Letest News
ड्रेनेजची तक्रार केली म्हणून महिलेवर हात उचलला! लाथाबुक्क्यांनी मारहाण दगडाने डोके फोडले ‘कुटुंबाला... शिर्डीत भक्तिमय वातावरणात श्री गोकुळाष्टमी उत्सव उत्साहात अनाथ बालकांसोबत ‘दबंग’ अधिकाऱ्याचा वाढदिवस!कायदा-सुव्यवस्थेत कणखर भूमिका सामाजिक जाणीवेतही तितकीच सं... मध्यस्थीची भावना जुनी आधुनिक स्वरूप अधिक परिणामकारक! — न्या. शिवाजी कचरे प्रमुख जिल्हा व सत्र न्याया... कडक शिस्तीच्या अधिकाऱ्याला सर्वपक्षीय सलाम! अमोल मोरे यांची प्रांताधिकारीपदी पदोन्नती सापडलेला लाखाचा मोबाईल साईभक्ताला परत संस्थान कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाला सलाम! निर्व्यसनी तरुणाईची एकजूट ढोल-ताशांच्या गजरात रंगणार गोविंदांचा जल्लोष शिर्डीच्या साईदरबारी भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा गोकुळाष्टमीनिमित्त साईचरणी सोन्याचा ब्रोच अर्पण भगवान थोरात यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राहाता तालुका प्रवक्तेपदी नियुक्ती
Blog

श्रीरामपूर हादरलं! दिवसा ढवळ्या थेट गोळीबारबंटी जहागीरदार मयत? अधिकृत घोषणेला विलंब – अफवांनी घेतला जोर

sai nirman
जाहिरात

श्रीरामपूरात दहशत! दिवसा ढवळ्या थेट गोळीबार
बंटी जहागीरदार मयत? अधिकृत घोषणेला विलंब – शहरात खळबळ
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज) – वर्षअखेरीच्या दिवशीच श्रीरामपूर शहरात थरारक गुन्हेगारी घटना घडली असून, दिवसा ढवळ्या झालेल्या गोळीबारामुळे संपूर्ण शहर हादरून गेले आहे. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बंटी जहागीरदार यांचा मृत्यू झाल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू आहे. मात्र, रुग्णालय किंवा प्रशासनाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम व तणाव वाढला आहे.
🔫 अंत्यविधीहून परतताना थेट हल्ला
कॉलेज रोड परिसरातील कबरीस्तान येथे अंत्यविधी आटोपून परतत असताना, जर्मन हॉस्पिटल परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी थेट निशाणा साधत गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
🚨 दुपारी अडीचच्या सुमारास गोळीबार – नागरिकांमध्ये भीती
३१ डिसेंबर रोजी दुपारी साडे दोनच्या सुमारास ही घटना घडली. कॉलेज रोड, जर्मन हॉस्पिटल परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक नागरिकांनी दुकाने बंद केली, तर काहींनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.
⚠️ कामगार हॉस्पिटलसमोर तणावपूर्ण वातावरण
गोळीबारानंतर बंटी जहागीरदार यांना उपचारासाठी कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ही बातमी पसरताच समर्थकांचा मोठा जमाव हॉस्पिटल परिसरात जमा झाला. संतप्त घोषणाबाजीमुळे परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली असून, पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला आहे.
❓ मृत्यूची चर्चा, पण अधिकृत माहिती नाही
सूत्रांकडून बंटी जहागीरदार यांच्या मृत्यूची माहिती समोर येत असली, तरी अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे अफवांना उधाण आले असून, शहरातील तणाव अधिकच वाढला आहे.
🔍 ‘सुपारी’ की जुने वैर? पोलिसांचा कसून तपास
हा गोळीबार—
नियोजित कट होता का?
जुन्या वादातून हल्ला झाला का?
कोणाच्या सांगण्यावरून गोळीबार करण्यात आला?
या सर्व शक्यतांचा विचार करत पोलीस सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, तसेच जुने गुन्हे व वादांचा सखोल तपास करत आहेत.
🚓 पोलिसांना थेट आव्हान?
गर्दीच्या परिसरात दिवसा ढवळ्या झालेला गोळीबार म्हणजे कायद्याला खुले आव्हान असल्याची चर्चा सुरू आहे. “आम्ही सुरक्षित आहोत का?” असा सवाल आता सामान्य नागरिक विचारू लागले आहेत.
🗣️ अप्पर पोलीस अधीक्षकांचे आवाहन
या घटनेबाबत अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी माहिती देताना सांगितले की,
“घटनेचा तपास वेगाने सुरू असून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात आले आहे. आरोपींना लवकरच ताब्यात घेतले जाईल. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे.”
👉 बंटी जहागीरदार यांचा मृत्यू झाला आहे का? अधिकृत घोषणा कधी होणार?
या प्रश्नाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, पुढील घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button