Letest News
शिर्डीत १७ सप्टेंबरला विशेष आधार व डाक सेवा शिबिरसन्मित्र युवक मंडळ व पोस्ट ऑफिस शिर्डीचा संयुक्त उप... श्री साईबाबा हॉस्पिटलला न्यूरोसर्जरीसाठी ४९ लाखांचे अत्याधुनिक उपकरण ‘साई ज्योत’ पेटली अन् पाकिटांचा धूर निघाला! चेअरमन विठ्ठल पवारांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला शिर्डीतील वाळू तस्करीवर ‘साईदर्शन’च्या वृत्तानंतरही कारवाई नाही! पोलिसांच्या कथित संगनमताची नागरिकां... ज्येष्ठ प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव (आबा) गोंदकर यांचे निधन साई समाधी मंदिरात नव्या चांदीच्या नंदीची विधिवत प्रतिष्ठापना हरतालिका पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम! शिर्डी पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल “गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट...
क्राईमशिर्डी

shirdi news:-शिर्डीत दोन गटात मारामारी एकाने केला कोयत्याने वार

शिर्डीत दोन गटात मारामारी एकाने केला कोयत्याने वार

शिर्डी प्रतिनिधी
शिर्डीत दररोज गुन्हेगारी वाढत चालली आहे याला कारणीभूत जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक असल्याचे बोलले जात आहे कारण कि शिर्डीतच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसादिवस वाढत चालली आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

ज्यांप्रमाणे गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे तसें होतांना दिसत नाहीत म्हणून गुन्हेगारांना व सामान्य लोकांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही सुपाऱ्या घेणे मुलं उचलून नेने हत्या सारखे प्रकार दररोज घडत आहेत जिल्हा पोलीस प्रमुख गुन्हेगारी रोखण्यास आकार्यक्षम असल्याची सामान्य नागरिकांची भावना झालेली आहे

kamlakar


शिर्डी ही साईबाबांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे ह्याभूमीत देश विदेशातून साईभक्त साईबाबांच्या दर्शनासाठी येत असतात त्यांचेही पाकिटमारणे चैनस्नेचिंग होणे गाडीच्या काचा फोडून गाडीतील सामान चोरून नेने मोबाईल चोराने हे नित्याची बाबा झालेली आहे शिर्डी पोलीस स्टेशनला पोलीसांची संख्याबळ कमी आहे

एक गुन्हा डिटेक्त होत नाही तोवर दुसरा गुन्हा दाखल होतो पहिल्या गुन्ह्याच तपास सुरु करताच व्ही आयपिंचा बंदोबस्त लागून जातो म्हणून पोलीसांनी कामे कशी करावीत हा प्रश्न पडतो पोलीसाची संख्या कमी आहे हे पोलीस अधीक्षकांना माहीत असून शिर्डी पोलीस स्टेशनला पोलीस बळ वाढवळे जात नाही

आणि पोलीस अधीक्षक सुद्धा येथे लक्ष देत नसल्याने शिर्डीत गुन्हेगारी वाढली आहे साईभक्त सुद्धा येथे जीव मुठीत घेऊन येत असल्याचे चित्र आहे आणि हे असेच सुरु राहिले तर शिर्डीत पुन्हा आराजक्ता वाढणार आहे काही दिवसांपूर्वी राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखेंनी शिर्डीत गुन्हेगारी वाढलेली आहे

म्हणून प्रसासनाची बैठकीत सर्व सूचना देऊन शिर्डीतील गुन्हेगारी कडे लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केलेले दिसून येत आहे
परवा रात्री शिर्डीत दोन गटात तुंबळ हाणामारी झाली त्यात एकाने दुसऱ्याच्या डोक्यात कोयता घातला आणि एकाच्या पायावर घाव घातले ते दोन्ही हॉस्पिटल मध्ये उपचार घेत आहेत ज्याच्या डोक्यात वार झालेले आहेत

त्याला 30 टाके पडले आहेत काल सकाळ पर्यंत त्याची परिस्तिथी नाजूक होती आता व्यवस्तीत असल्याचे कळते आणि दुसऱ्या जखमीला ही काही टाके पडले असल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे दोन्ही गट एकमेका विरोधात तक्रार देणार असल्याचे कळते

आतापर्यंत शिर्डी पोलीस स्टेशनला कुठलाही गुन्हा दाखल झालेला नसून बहुतेक ज्याच्या डोक्याला मार लागलेला आहे त्याची प्रकृती बरी झाल्यावर परस्पर विरोधी गुन्हे दाखल होतील असे समजते शिर्डीत आधीच गर्दी कमी आहे शिर्डीत लूटमार होते आणि असे प्रकार घडते म्हणून साईभक्त येथे जास्त थांबत नाहीत

परिणामी शिर्डीत गर्दी न झाल्याने शिर्डीतील व्यावसायिक त्रासलेले आहेत असेच प्रकार शिर्डीत घडत राहिले तर शिर्डीची ओढख गुन्हेगारांची शिर्डी होण्यास वेळ लागणार नाही म्हणून स्वतः पोलीस महासंचालकानी येथे लक्ष घालून अहमदनगरला कृष्णप्रकाश सारखे सिंघम पोलीस अधीक्षकांची नियुक्ती करून शिर्डीची पावित्रता आबाधित कशी राहील हे प्रयत्न करने गरजेचे झालेले आहे

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button