Letest News
“गुन्हेगारीचे उदात्तीकरण आक्षेपार्ह रील्स अन् वाढीव साऊंड खपवून घेणार नाही!” — भारती-गलांडे यांचा मं... पत्रकार’ असल्याचे सांगत पाच हजारांची खंडणी!तहसीलदार-प्रांत अधिकाऱ्यांकडून कारवाई करवून घेण्याची धमकी समृद्धी महामार्गावर दरोड्याचा डाव उधळला! तलवार- कत्ती- पंक्चर करण्यासाठी खिळ्यांच्या फळ्या अन् बनावट... मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे द... राष्ट्रीय लोकअदालतमध्ये ४९४१९ इतकी प्रकरणे निकाली आणि साधारणतः ४९ कोटी रुपयांची तडजोड शिर्डी विकास सोसायटीत ‘एकाच खुर्ची’चा बादशहा! सचिव बडे यांच्याविरोधात सभासदांचा एल्गार सचिन गोंदकर यांच्या अकाली निधनाने शिर्डीत हळहळ डॉ. एकनाथ काका गोंदकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर “कुठे ट्रम्प कुठे गल्लीतील फिरणारे तुम्ही?” पिपाडांचा सुजय विखेंवर घणाघात! बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा दणका! विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोन भंगार दुकानदारांवर गुन्हे ... शांत, संयमी पण कायद्याच्या अंमलबजावणीत दबंग अधिकारी रणजीत गलांडे यांचा वाढदिवस
अ.नगरराजकीय

शिर्डी विधानसभा मतदारसंघात ९८ मतदारांनी केले गृहमतदान

शिर्डी, दि.१४ – शिर्डी विधानसभा मतदारसंघात आजपासून गृह मतदानास (होम वोटिंग) सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी ९८ मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ८५ वर्षांवरील ८५ ज्येष्ठ नागरिक, तर १३ दिव्यांग मतदारांचा समावेश असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने दिली आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा व मतदानापासून कोणीही मतदार वंचित राहू नये, यासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही ८५ वर्षांवरील व दिव्यांग नागरिक जे मतदान केंद्रापर्यत पोहोचू शकत नाही अशा मतदारांसाठी घरुनच मतदान करण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी नमूना १२ डी भरून घरूनच मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी येत्या २० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

शिर्डी विधानसभा मतदारसंघासाठी गृह मतदानासाठी १९८ मतदारांनी नोंदणी केली आहे. १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत गृह मतदान होणार आहे. मतदान केंद्राध्यक्ष, मतदान‌ अधिकारी व‌ सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश असलेल्या ८ पथकांच्या माध्यमातून गृह मतदान मोहीम राबविण्यात येणार आहे. गृह‌ मतदानांसाठी टपाली मतपत्रिकेचा वापर करण्यात येणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी तथा समन्वयक अधिकारी जालिंदर पठारे,‌नायब तहसीलदार हेमंत पाटील, बाळासाहेब मुळे, मनोज भोसेकर गृह मतदान‌ प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button