Letest News
पाथर्डीत समता पतसंस्थेचा गाशा गुंडाळला? ठेवीदारांचे लाखो अडकले? पाथर्डीत एकच खळबळ समता पतसंस्थेच्या घोटाळ्यात ED ची मोठी एन्ट्री-अशोक खरातच्या लॉकरमधून कोट्यवधींचं घबाड “साईप्रसाद की भ्रष्टाचार?” प्रसादालयातील खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह शिर्डीत फसवणुकीचा नवा डाव! गजराच्या नावाखाली भाविकांची लूट लोणीत गर्भलिंग निदान रॅकेटचा मोठा पर्दाफाश- आणखी १ डॉक्टरसह २ एजंट जाळ्यात निमगाव को-हाळे बायपासवर भीषण अपघात — कातोरे वस्ती हादरली! काका कोयटे हजर हो! SID ची नोटीस-समता पतसंस्थेत १००+ बोगस खाती? सावकारीच्या जाळ्यात अडकलेले शिर्डी? खरात अटकेत-मोठ्या नावांची धास्ती!” “पोलीसांचा मोठा फटका! अशोक खर... शिर्डीची लेक ठरली उज्ज्वल यशाची प्रेरणा — डॉ. सृष्टी सोनवणे यांचे एमबीबीएसमध्ये उच्च श्रेणीने यश शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यासाठी २१३ कोटी रुपयांची तरतूद
क्राईमशिर्डी

 खबरदार वृत्तपत्र स्वातंत्र्यावर कोणी पैशाच्या जीवावर घाला घालण्याचा प्रयत्न करत असेल व पत्रकारांला बातमी दिली म्हणून दमबाजी करत असेल तर जशास तसे देण्यात येईल उत्तर!!

शिर्डी (प्रतिनिधी) 

sai nirman
जाहिरात

शिर्डी येथील शेअर्स घोटाळा प्रकरणासंदर्भात गुंतवणूकदारांची आपापसात व दबक्या आवाजात सुरू असलेल्या चर्चेचे वृत्त दैनिक साई दर्शन पोर्टलवर प्रसारित केले असता त्याचा राग धरून सत्याला वाचा फोडणारे पत्रकार जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांना बातमी का टाकली म्हणून  मोबाईलवर दमबाजी करण्यात आली. दमबाजी करणाऱ्यां विरोधात जितेश लोकचंदानी यांनी फिर्यादही शिर्डी पो.स्टे.ला लगेचच दाखल केली आहे. मात्र सत्यसमोर मांडणाऱ्या पत्रकाराला दाबण्यासाठी पैशाच्या जीवावर कुणी प्रयत्न करत असेल तर ते सर्वसामान्य जनता सहन करणार नाही. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वृत्तपत्र व पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. असे म्हटले होते. पण काहीजण पैशाच्या जीवावर सत्य उजेडात येऊ नये म्हणून लोकशाहीच्या या स्तंभावर घाला घालत आहेत. निर्भीड पत्रकारिता करणारे ,सत्य उजेडात आणणारे अशा पत्रकारांवर या पुरोगामी राज्यांमध्ये आतापर्यंत अनेक दबाव, दमबाजी ,हल्ले झाले आहेत. मात्र निर्भीड पत्रकार हा कधीही न डगमगता आपले काम सुरू ठेवत असतो तसेच जितेश लोकचंदानी हे शिर्डीतील निर्भीड पत्रकार असून सत्य त्यांनी उजेडात आणण्याचा प्रयत्न केला आहे. गुंतवणूकदारांची दबक्या आवाजातील चर्चा त्यांनी उघड केली आहे.त्यांनी येथील शेअर्स मार्केट घोटाळा प्रकरणी जी शिर्डीत गुंतवणूकदारांमध्ये जी चर्चा आहे त्या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले असताना त्यांना काही जण मोबाईलवर धमकी देत आहेत. मात्र यापुढे सत्य उजाडत आणणारे व सडेतोड वृत्तप्रसारित करणारे पत्रकार जितेश मनोहरलाल लोकचंदानी यांना  ही बातमी छापली म्हणून जर कोणी दमबाजी करत असेल, धमकी देत असेल तर हा लोकशाही च्या चौथ्या स्तंभावर घाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या लोकशाहीवर व पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभावर कोणी घाला घालण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्हीही शांत बसणार नाही. त्या विरोधात आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही सत्याची बाजू मांडणाऱ्यांना आमचा नेहमी पाठिंबा आहे व राहणार आहे . जर कोणी विनाकारण त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यास जशास तसे उत्तर दिले जाईल. असा इशारा भारतीय लहुजी सेनेचे कार्याध्यक्ष समीर रामचंद्र वीर यांनी दिला आहे.

DN SPORTS

kamlakar

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button