Letest News
संघर्षाच्या वाटेवरून यशाची पहिली पायरी चढला गौरव लोकचंदानी-बार कौन्सिलची सनद मिळवत वकिलीच्या नव्या प... शिर्डीतील ‘चिन्नाराव’ हॉटेलच्या जेवणात झुरळ? फोटो समोर येताच खळबळ! “विखे पाटलांना काहीच कळत नाही त्यांना फक्त साखर कारखानाच कळतो!” – मनोज जरांगे पाटील तालुक्याला दोन आमदार पण एकही नाही दमदार!रस्त्यांच्या खड्ड्यांनी हैराण कोपरगावकरांचा संताप फलकावर पुण्यातील साईभक्त रामदास तापकीर यांनी अर्पण केला १३ लाख ४२ हजार ९८० रुपये किंमतीचा ९० ग्रॅम सोन्याचा... शिर्डीचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक अमोल विठ्ठलराव गंगलवाड चे टोकाचे पाऊल रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्... उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन अहिल्यानगर पोलिस दलात खळबळ! अमली पदार्थ विक्रीकांडात LCBचे माजी प्रमुख कबाडींना मॅटचा दणका नितीन गडकरी ॲक्शन मोडमध्ये- नगर–मनमाड महामार्गाच्या चौकशीसाठी केंद्रीय समिती‘ट्रंप तात्या डांबर देत ... राहता पोलिसांची दमदार कारवाई काल महिलेला लुटले आज चारही आरोपी ताब्यात!
Blog

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे शिर्डीत साईबाबा समाधी दर्शन

शिर्डी | प्रतिनिधी :
शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे साहेब यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेतले. पहाटेच्या सुमारास त्यांनी साईचरणी नतमस्तक होत राज्याच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. दर्शनावेळी मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दर्शनावेळी शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती
या वेळी मा. आमदार आमोल खताळ साहेब, मा. खासदार सदाशिव लोखंडे साहेब, शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. साईबाबा समाधी दर्शनानंतर मंदिर प्रशासनाकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
साईचरणी राज्यहितासाठी प्रार्थना, भक्तांमध्ये उत्साह
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दर्शनामुळे साईभक्तांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी “शिंदे साहेब” यांच्या नावाचा जयघोष केला. राज्यातील जनतेसाठी, शेतकरी, कामगार व युवकांच्या कल्याणासाठी साईबाबांनी कृपा करावी, अशी प्रार्थना त्यांनी केल्याचे सूत्रांकडून समजते.
राजकीय व सामाजिक पातळीवर भेटीगाठी, चर्चांना उधाण
साईदर्शनानंतर उपमुख्यमंत्र्यांनी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. आगामी राजकीय घडामोडी, संघटन बांधणी व स्थानिक प्रश्नांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांच्या या शिर्डी दौऱ्याला राजकीय व सामाजिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व दिले जात आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button