Letest News
समान काम-समान वेतनासाठी संदीप सोनवणे यांचा एल्गार-साई संस्थानातील आऊटसोर्स कर्मचाऱ्यांवर अन्याय-सुवि... लहामगे व खाबिया ह्या गुटखा माफियांना नेमके कोणाचे अभय? शिर्डीत संतप्त सवाल बंदी असूनही गुटखा विक्री दीड लाखांचे दागिने सापडूनही मोह टाळला-स्वच्छता कर्मचाऱ्याने जपला साईसेवेचा मान दारूबंदी विभाग सुस्त-नगर परिषद मस्त-पोलिसांची सुरू आहे गस्त! शिर्डीत दारू धंदे सुरू आहे बिनधास्त वाढदिवसानिमित्त समाजसेवेचा अनोखा संकल्प-स्वराचा मुख्यमंत्री सहायता निधीस खारीचा वाटा-तांबे कुटुंबाच्... संविधान डोक्यावर घेऊन अशोक लोंढे यांची श्रीरामपूर ते शिर्डी पदयात्रा-तुकाराम मुंडे यांच्या कार्याला ... श्री साईचरणी २९ लाखांचा सुवर्ण मुकुट ५.४० लाखांचा सोन्याचा ब्रोचही अर्पण न्यायासनावरील दरारा-मनात साईभक्ती-राजेश गुप्ता साहेबांना भावपूर्ण निरोप हिरोज ऑफ अहिल्यानगर २०२६ पुरस्काराने अशोकलाल (काका) लोढा यांचा गौरव मंगळसूत्र सापडले पण परत न करता खिशात टाकले-शिर्डीत चोरीचा गुन्हा दाखल
अ.नगरशिर्डी

saibaba mandir news नाताळ व नवीन वर्षाच्या तयारीसाठी साईबाबा संस्थान कडून तयारी

शिर्डी प्रतिनिधी/ श्री साईबाबा संस्‍थान शिर्डीच्‍या वतीने नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त शिर्डी महोत्‍सवाचे आयोजन करण्‍यात आले असून श्री साईबाबांच्‍या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून समाधी मंदिर मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


श्री.कोळेकर म्‍हणाले, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त श्रींच्‍या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात साईभक्त भाविक येत असतात. येणा-या सर्व साईभक्ताना साईच्या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ मिळावा व होणा-या गर्दीचे नियोजन व्‍हावे या हेतूने मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्‍यात येणार आहे.

त्‍यामुळे दिनांक ३१ डिसेंबर रोजीची शेजारती व दिनांक १ जानेवारी २०२५ रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.
तसेच नाताळ व नवर्षाच्‍या सुट्टीच्‍या गर्दीमुळे बुधवार दिनांक २५ डिसेंबर ते बुधवार दिनांक १ जानेवारी रोजी असे ७ दिवस वाहन पूजा बंद राहतील. परंतु नाताळ सुट्टीचे कालावधीत श्री साईसत्‍यव्रत पूजा, अभिषेक पूजा सुरु राहील याची सर्व साईभक्‍तांनी नोंद घ्‍यावी, असे सांगुन मंदिर व परिसरात फटाके व वाद्य वाजविण्‍यास मनाई करण्‍यात आली असुन सुरक्षिततेच्‍या दृष्‍टीने शिस्‍तीचे पालन करण्‍याचे आवाहनही श्री.कोळेकर यांनी केले.


हा महोत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे प्र.मुख्‍य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे प्र.उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी व सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी युध्द पातळीवर प्रयत्न करत आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button