Letest News
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशानंतर खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा जल्लोषात सत्कार साई प्रसादालयातील सेवेबाबत भरत मोरे यांची नाराजी व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी महामहीम राष्ट्रपतींनी गौरवलेल्या साईप्रसाद भोजनालयाची बदनामी अयोग्य-भरत मोरे यांच्या भूमिकेवर कमलाकर... "छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन चालणार नाही विचारही जगावे" : राजमाता कल्पनाराजे शिर्डी - महिला लोकप्रतिनिधींनी देखील दारुबंदीसाठी पुढे यावे ! चंद्रपूरसारखे रणरागिणीचे रौद्र रुप एकद... फसवणूक प्रकरणात कल्पना खरात यांना अटकपूर्व जामीन मंजूर लग्नाच्या नावाखाली लाखोंची फसवणूक-राहाता पोलिसांनी बनावट विवाह रॅकेटचा केला पर्दाफाश! "आयुक्त तुकाराम मुंडे अॅक्शन मोडमध्ये--शिर्डीत पेढ्यांवर धाड-हजारो किलो माल जप्त!" दारूबंदी केवळ कागदावरच? शिर्डीत अवैध दारूविक्रीचा सुळसुळाट-गुन्हेगारीला मिळतेय खुलेआम खतपाणी! शिर्डी प्रसादालयात गोंधळ-शिवसेना पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल-सोशल मीडियावरील व्हिडिओही ठरला वादाचा विष...
क्राईमशिर्डी

हॉटेल कलासाईच्या कॉम्प्लेक्स मध्ये शॉक लागून एका तरुणाचा मृत्यू चौघांवर गुन्हा दाखल

शिर्डी प्रतिनिधी ए.सी.दुरुस्तीच्या कोपरगाव येथील तुषार होडे व संजय होडे यांच्या दुकानात अंभय संजय पोटे वय २१ रा निवारा कोपरगाव हा कामास असताना त्याला शिर्डीत वातानुकूलित यंत्र (ए.सी.) दुरुस्तीसाठी शिर्डीत पाठवले असता त्यास महावितरण कंपनीच्या उच्च दाबाच्या विद्युत तारांचा शॉक लागून तो त्यात ठार झाला असल्याची फिर्याद मयत तरुणाचे वडील संजय बाबुराव पोटे (वय-५४) यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली असून या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

माहिती अशी की संजय पोटे हे कोपरगाव शहरातही निवारा हौसिंग सोसायटी परिसरात राहतात .त्यांना दोन मुले आहेत.त्यातील अभय पोटे हा तुषार होडे व सूरज होडे यांच्या रेफ्रिजरेशन व ए.सी.रिपेरिंगच्या दुकानात कामास होता. त्यांच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. दरम्यान तुषार पोटे हा दि.११ मे २०२४ रोजी होडे बंधूंच्या दुकानात गेला असता

kamlakar

त्यास त्यांनी शिर्डी येथील हॉटेल कलासाई कॉम्प्लेक्स मध्ये नवीन ए.सी.बसविण्यासाठी कामास गेला होता.दरम्यान दुपारी २.३० वाजेच्या सुमारास आपल्याला दुकान मालक तुषार होडे यांचा फोन आला की”तुमचा मुलगा हा उच्च दाबाच्या विजेच्या धक्क्याने खाली पडला आहे.त्याला आम्ही शिर्डी येथील साईबाबा रुग्णालयात उपचारार्थ भरती केला आहे.

त्यावेळी आपण आपल्या एका सहकाऱ्यास घेऊन तातडीने शिर्डीत रुग्णालयात गेलो असता त्या ठिकाणी आपला मुलगा अभय पोटे हा मृत झाला असल्याची धक्कादायक माहिती मिळाली होती.दरम्यान त्याचे शव विच्छेदन केल्यानंतर त्याचा अंत्यविधी केल्या नंतर आपण शिर्डी येथे येऊन हा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.३१९/२०२४ भा.द.वि.३०४(ए)व ३४ प्रमाणे महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणा सह तुषार होडे व सूरज होडे दोघे रा.राम मंदिराजवळ कोपरगाव व आणि आणखी एक अनोळखी संशयित अशा चौघा विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.सदर घटनास्थळी पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पपु .कादरी हे करीत आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button