Letest News
“दैवी शक्ती”च्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण! अशोक खरात प्रकरणात SITचा स्फोटक खुलासा लोणी पोलिसांच्या तपासाला मोठे यश! उर्वरित बोगस डॉक्टरांना कधी अटक होणार?” ⚠️ साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा-अन्यथा प्रशासन जबाबदार!” 🚨 “द्वारकामाईत साईभक्त अक्षरशः घामाघूम- राजेंद्र कोते पाटील यांची संस्थान प्रशासनाला भावनिक साद” राहात्यात पोलिसांचा धाक संपला? गुन्हेगार मोकाट-नगराध्यक्षांचा संताप शिर्डीत ‘MOBILEWALA’ चे दिमाखदार आगमन मोबाईल व होम अप्लायन्सेसच्या विश्वात नवा अध्याय सुरू आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी साई संस्थानचा मोठा आधार; मोफत निवासी CET कोचिंगची घोषणा शिर्डीत पर्यटकांच्या गाड्यांवर चोरट्यांचा डल्ला साईभक्ताची बॅग-मोबाईल आणि रोख रक्कम लंपास पोलीस असल्याची बतावणी-प्रेमसंबंधांचे आमिष अन् शिर्डीत अत्याचार? नांदगाव प्रकरणाने खळबळ “डेथ नेटवर्क”चा फैलाव? राहाता तालुक्यात गर्भलिंग रॅकेटची भीषण साखळी उघड होण्याची चिन्हे
राजकीयशिर्डी

साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल-शिर्डीच्या विद्यार्थ्याचे जिल्हास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात उज्वल यश

श्री साईबाबा संस्थान संचलित श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, शिर्डी (प्राथमिक विभाग) यांनी जिल्हास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात उल्लेखनीय यश संपादन करून शिर्डीच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला आहे.
जिल्हा परिषद अहिल्यानगर, पंचायत समिती अकोले व विज्ञान-गणित अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान-गणित व पर्यावरण प्रदर्शन (सन २०२५–२६) हे श्री नागेश विद्यालय, जामखेड येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या प्रदर्शनात अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे २३४ उपकरणे सहभागी झाली होती.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

या स्पर्धेत श्री साईबाबा इंग्लिश मिडियम स्कूल, शिर्डीच्या प्राथमिक विभागातील इयत्ता सहावीचा विद्यार्थी चि. साई विलास सिनगर याने ‘ग्रीन एनर्जी’ या विषयावर आधारित प्रभावी व नाविन्यपूर्ण उपकरण सादर करून द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशामुळे त्याची नागपूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
या यशामागे विज्ञान शिक्षक श्अमोल निर्मळ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रदर्शनाचा समारोप व बक्षीस वितरण समारंभ मा. ना. राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, अहिल्यानगर यांच्या शुभहस्ते पार पडला.


या उज्वल यशाबद्दल विद्यार्थी चि. साई विलास सिनगर व मार्गदर्शक शिक्षकांचे
मा. न्या. अंजू शेंडे-सोनटक्के (अध्यक्ष, तदर्थ समिती तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश),
मा. डॉ. पंकज आशिया (जिल्हाधिकारी अहिल्यानगर),
मा. श्री. गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. (मुख्य कार्यकारी अधिकारी),
मा. श्री. भिमराज दराडे (उपमुख्य कार्यकारी अधिकारी),
मा. श्री. अतुल वाघ (प्र. प्रशासकीय अधिकारी),
सौ. शिल्पा पुजारी (मुख्याध्यापिका),
श्री. आसिफ तांबोळी (प्राचार्य)
तसेच मा. श्री. राजेश पावसे (गटशिक्षणाधिकारी, राहाता पंचायत समिती)
यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button