Letest News
शिर्डीत साईभक्त महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन ओरबाडल्याची धक्कादायक घटना समोर आली शासकीय विश्रामगृहात व्हिआयपी!व्हिव्हिआयपी तथा मंत्रीगण येतात!! थंड पेय तथा चहा! कॉफी पंचपक्वाने सोबत... राहात्यात सोशल मीडियावर बदनामीचा धडाका सहा जण पोलिसांच्या रडारवर! मंत्र्याचा मुलगा राजकुमार शिर्डी परिसरात पोलीस वाहनांच्या ताफ्यात फिरण्यावरून राजेंद्र पिपाडांचा घणा... नागपूरच्या साईभक्ताकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा सोन्याचा आकर्षक ओम ब्रोच श्री साईचरणी अर्पण अॅड. गौरव लोकचंदानीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा! NMIMSमध्ये अॅड. गौरव लोचंदानींचा विशेष सन्मान जय महाकाली मित्र मंडळाची नवरात्रोत्सवाच्या नियोजनासाठी आज बैठक “माझ्या विजयावर स्वार होण्याचा प्रयत्न!”सुजय विखेंच्या ‘स्वीडनमध्ये खासदार झालो’ वक्तव्याने नीला विख... नो डीजे नो डॉल्बी! क्रांती युवक मंडळाची पारंपरिक विसर्जन मिरवणूकढोल-ताशांच्या गजरात पालखीत विराजमान ... श्री साईबाबा कन्या विद्या मंदिरच्या कु. आकांक्षा क्षीरसागरची राज्यस्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी निवड
क्राईमशिर्डी

लहामगे व खाबिया ह्या गुटखा माफियांना नेमके कोणाचे अभय? शिर्डीत संतप्त सवाल बंदी असूनही गुटखा विक्री

शिर्डी : महाराष्ट्रात गुटख्यावर बंदी असताना शिर्डी आणि राहाता तालुक्यात अवैध गुटखा विक्रीबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असताना आणि अवैध व्यापाराबाबत चर्चा होत असताना संबंधित यंत्रणांची कारवाई अपेक्षित प्रमाणात दिसून येत नसल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
साईबाबांच्या पवित्र नगरीत लाखो भाविक दररोज येत असताना काही ठिकाणी अवैध गुटखा विक्रीचे जाळे कार्यरत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. तर तो कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांपासून व्यापारी वर्गापर्यंत चर्चेचा विषय बनला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar


गुटखा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी केवळ किरकोळ हालचाली होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे मोठ्या पुरवठादारांपर्यंत यंत्रणा पोहोचत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अवैध व्यापार करणाऱ्यांचे आर्थिक हितसंबंध, पुरवठा साखळी आणि साठवणूक केंद्रांची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.
प्रमुख आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे करण्यात आलेल्या निवेदनात शिर्डी परिसरातील गुटखा तस्कर लहामगे व आशिष खाबिया यांची सखोल चौकशी करून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच गुटखा पुरवठा करणारे, साठवणूक करणारे आणि वितरण करणाऱ्या संपूर्ण साखळीवर संयुक्त कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
साईनगरीची ओळख भक्ती, सेवा आणि अध्यात्माची आहे. त्यामुळे शिर्डीची प्रतिमा मलिन करणाऱ्या कोणत्याही अवैध व्यवसायावर कठोर कारवाई व्हावी आणि दोषींना कायद्याचा धाक दाखवावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

जाहिरात
sai ganesh

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button